मुंबई: पाच राज्यांमधील निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर मोदी सरकारने अपेक्षेप्रमाणे पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात वाढ केली. त्यामुळे मंगळवारी पेट्रोल 15 पैसे तर डिझेल 18 पैशांनी महागले. तब्बल 66 दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. (Petrol and Diesel rates in your city)
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 27 फेब्रुवारीपासून कोणतीही वाढ झाली नव्हती. मार्च महिन्यात उलट इंधनाच्या दरामध्ये चारवेळा कपात झाली. मात्र, आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर वाढल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना इंधन दरवाढ करणे अपरिहार्य होते. मात्र, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका सुरु असल्याने केंद्र सरकार कोणताही धोका पत्कारायला तयार नव्हते. त्यामुळे किमान मतदानाचा शेवटचा टप्पा संपेपर्यंत मोदी सरकारकडून पेट्रोल-डिझेलचे दर कृत्रिमरित्या कमी ठेवले जातील, असा जाणकारांचा अंदाज होता.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरी या पाच राज्यांमध्ये आता नवे सरकार स्थापन होईल. यापैकी आसाम, पुदुचेरी आणि तामिळनाडूत भाजपला अपेक्षित यश मिळाले. मात्र, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये भाजपच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले.
मुंबई: पेट्रोल- 96.95, डिझेल 87.98
पुणे: पेट्रोल- 96.60, डिझेल 86.30
नाशिक: पेट्रोल- 97.36, डिझेल 87.04
औरंगाबाद: पेट्रोल- 98.19, डिझेल 89.22
मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल.
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात.
संबंधित बातम्या:
Gold Price Today: सोने पुन्हा महागले, चांदीच्या किमतीतही वाढ, खरेदी करण्यापूर्वी दर नक्की पाहा
कोव्हिड योद्ध्यांना आता सरकारी नोकरीत प्राधान्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
(Petrol and Diesel rates in your city)