नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल, डिझेल आणि एपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किमती सातत्याने वाढत आहेत. इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे, तर विरोधक सरकारवर वारंवार हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या (LPG Gas Cylinder) किंमती मार्च किंवा एप्रिलमध्ये कमी होऊ शकतात. प्रधान म्हणाले की, तेल उत्पादक देशांना तेलाचे उत्पादन वाढविण्यास सांगितले आहे, जेणेकरुन भारतातील सामान्य जनतेला तेलाच्या वाढत्या किंमतींपासून दिलासा मिळेल. (Petroleum minister Dharmendra Pradhan says Petrol Diesel and LPG Gas cylinder prices may fall by April)
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते की, तेल उत्पादक देशांकडून कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे पेट्रोलियम पदार्थ देशात महाग होत आहेत. त्यांच्या देशाच्या हितासाठी अधिक नफा मिळविण्यासाठी, कच्च्या तेलाचा पुरवठा करणारे देश कच्च्या तेलाच्या किंमती वाढवत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींबद्दल धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, हिवाळ्यामुळे डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढले आहेत, हिवाळ्यात असे होते. आता हिवाळा संपला आहे, मग किंमती कमी होतील.
कोरोनामुळे होणारा खप कमी झाल्यामुळे तेल उत्पादक देशांनी तेलाचे उत्पादन कमी केले होते. पण आता परिस्थिती सामान्य झाली आहे. तेलाची मागणी वाढली आहे, तरीदेखील उत्पादन वाढवण्यात आलेले नाही. त्यामुळे एलपीजीचा वापर वाढला आणि उत्पादनाअभावी किंमती वाढल्या. तथापि, आता मार्चच्या उत्तरार्धात आणि एप्रिलच्या सुरूवातीला एलपीजीच्या किंमतीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल.
धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, भारत हा सर्वात मोठा तेल खरेदीदार आहे. त्यामुळे भारताने रशिया, कतार आणि कुवैत सारख्या तेल उत्पादक देशांवर तेलाचे उत्पादन वाढवण्यासाठी दबाव आणला आहे. जेव्हा तेलाचे उत्पादन वाढेल तेव्हा प्रति बॅरलची किंमत कमी होईल आणि नंतर किरकोळ तेलाची किंमतही कमी होईल.
सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर देशभरातील ऐतिहासिक विक्रमी स्तरावर पोहोचले आहेत. तेलाच्या किंमती 16 पटीने वाढल्या आहेत. शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. रविवारी तेलाचे दर मात्र स्थिर राहिले.
तेल उत्पादक देशांच्या संदर्भात धर्मेंद्र प्रधान म्हणाले, आपण किमती वाढवू शकत नाही, कारण त्याचा परिणाम आयात देशांवर होतो. खराब हवामानामुळे अमेरिकेतील उत्पादन गेल्या दोन-तीन आठवड्यांत मंदावले आहे. येत्या काही दिवसात परिस्थिती सुधारण्याची आशा आहे. तत्पूर्वी, धर्मेंद्र प्रधान यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, त्यांचे मंत्रालय जीएसटी कौन्सिलला पेट्रोलियम पदार्थांना त्याच्या कक्षेत समाविष्ट करण्याची विनंती करत आहे, कारण त्याचा फायदा लोकांच्या हितासाठी होणार आहे
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही असे संकेत दिले होते. जीएसटी कौन्सिलने पेट्रोलियम मंत्र्यांच्या सूचनेची अंमलबजावणी केल्यास देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती निम्म्यावर आणल्या जातील. त्यांनी सांगितले की, राजस्थान आणि महाराष्ट्रात कराचा मोठा वाटा राज्य सरकारचा आहे. राजस्थानात कॉंग्रेसचे सरकार आहे आणि महाराष्ट्रात कॉंग्रेस महाविकास आघाडीचं सरकार आहे. म्हणजेच सोनिया गांधींनी आधी महाराष्ट्र सरकारांशी बोलले पाहिजे, असंही त्यांनी सुचवलंय.
पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वृत्तसंस्था एएनआयला ही माहिती दिलीय. प्रधान म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किमतीचा ग्राहकांवर परिणाम झालाय. जेव्हा हिवाळा संपेल तेव्हा किमती देखील खाली येतील. वाढत्या मागणीमुळे हिवाळ्यात किमती गगनाला भिडल्या आहेत. येत्या काही दिवसांत किमती कमी होतील.
संबंधित बातम्या
फक्त 94 रुपयांमध्ये मिळेल गॅस सिलेंडर, आज आहे शेवटची संधी; ‘असा’ करा बूक
आता पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त होणार; पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी सांगितले ‘कारण’