Marathi News National Photos of Farmer protest to Delhi riots by Pulitzer prize winning journalist Danish Siddiqui
Danish Siddiqui : पत्रकारितेतील सर्वोच्च पुरस्काराने सन्मान, हजारो शब्दांची ताकद असणारे पत्रकार दानिश यांचे निवडक फोटो
फोटोग्राफीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं वेगळं स्थान निर्माण करणारे दानिश मोजक्या पत्रकारांपैकी एक होते. त्यांनी भारतात टिपलेले अनेक फोटो गाजले. त्यात दिल्ली दंगलीपासून शेतकरी आंदोलनापर्यंतचा समावेश आहे.
1 / 12
जागतिक दर्जाचा प्रतिष्ठित पुलित्झर पुरस्कार विजेते पत्रकार दानिश सिद्दीकी यांचा तालिबान आणि अफगाणिस्तान संघर्ष कव्हर करताना मृत्यू झाला. त्यानंतर जगभरातून त्यांना आदरांजली दिली जात आहे. फोटोग्राफीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं वेगळं स्थान निर्माण करणारे दानिश मोजक्या पत्रकारांपैकी एक होते. त्यांनी भारतात टिपलेले अनेक फोटो गाजले. त्यात दिल्ली दंगलीपासून शेतकरी आंदोलनापर्यंतचा समावेश आहे.
2 / 12
दानिश यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधातील आंदोलनात हातात बंदुक घेऊन आंदोलकांना धमकावणाऱ्याचा काढलेला फोटो चांगलाज गाजला.
3 / 12
दिल्लीतील CAA विरोधी आंदोलनातील धार्मिक उन्मादही दानिश यांनी कॅमेऱ्यात टिपला. हिंदुत्ववादी कट्टरतावाद्यांनी धार्मिक घोषणा देत मुस्लीम आंदोलकांवर केलेल्या हल्ल्याने देश हादरला. ते क्षण दानिश यांनीच टिपले.
4 / 12
जागतिक पातळीवर अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरत असलेलं शेतकरी आंदोलन देखील दानिश यांनी प्रभावीपणे टिपलं. या आंदोलनात अगदी तरुण वयातील मुलींपासून तर वयोवृद्ध महिलांपर्यंतचा सहभाग त्यांनी आपल्या फोटोंमधून दाखवलं.
5 / 12
शेतकरी आंदोलातील लाखो शेतकऱ्यांचा सहभाग आणि या प्रश्नाचं व्यापक स्वरुप दानिश यांच्या फोटोंमधून स्पष्टपणे पाहायला मिळतं.
6 / 12
आक्रमक आंदोलक आणि पोलीस प्रशासनाची कारवाई यातून उद्भवलेला संघर्षही त्यांच्या फोटोंमध्ये दिसतो.
7 / 12
दिल्लीतील शेतकरी आंदोलनात पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या त्यावेळचा क्षण.
8 / 12
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनने मजुर कामगारांचे प्रचंड हाल केले. कामगारांच्या या वेदना दानिश यांनी अचूकपणे टिपल्या.
9 / 12
दानिश यांनी रोहिंग्या समाजावरील अत्याचाराचं केलेलं कव्हरेज तर पुलित्झर पुरस्काराने सन्मानित झालं.
10 / 12
रोहिंग्या स्थलांतरितांची जगण्याची लढाई आणि हतबलता प्रभावीपणे दाखवणारे हे फोटो जगभरात चर्चेचा विषय ठरले.
11 / 12
दानिश यांनी दंतकथा बनलेल्या उत्तर कोरियात जाऊन तेथील परिस्थितीही आपल्या कॅमेऱ्यात टिपली. त्यातलच हा एक फोटो. हाच फोटो त्यांचा ट्विटरवरील शेवटचा कव्हर फोटो ठरला.
12 / 12
दानिश सध्या तालिबान आणि अफगाणिस्तानमधील संघर्ष कव्हर करत होते. यावेळी ते सैन्याच्या बरोबरीने धावपळ करत या घटना कव्हर करत होते. त्यात आराम करणंही शक्य नव्हतं. सलग 15 तास चाललेल्या सैन्याच्या मोहिमेत तेही जीव धोक्यात घालून याचं रिपोर्टिंग करत होते. 15 तासांनी त्यांना 15 याच धावपळीतून 15 मिनिटांचा मिनिटांचा ब्रेक भेटला. तेव्हा त्यांनी हा फोटो शेअर केला होता. याच संघर्षाला कव्हर करताना त्यांचा मृत्यू झाला.