Photos : देवभूमी उत्तराखंडमध्ये पुन्हा हाहा:कार, एक एक फोटो सांगतोय जीवन-मरणाची कसोटी
उत्तराखंडमधील जोशीमठ येथे हिमकडा कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
-
-
जोशीमठमध्ये हिमकडा कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
-
-
जोशीमठ उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात आहे. 7 फेब्रुवारीला सकाळी हिमकडा कोसळल्यामुळे या भागात हाहाःकार माजला.
-
-
या भागातील धोली गंगा नदीमधील पाण्याची पातळी अचानक वाढल्याने वाढत्या पाण्याच्या वेगाने या नदीवरील धरण फुटलं.
-
-
या घटनेत आतापर्यंत 100 से 150 नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. असं असलं तरी अद्याप अधिकृत आकडा आलेला नाही.
-
-
धरण फुटल्यानंतर अनेक लोक वाहून गेले. हे सर्व लोक धरणाच्या खालच्या भागात राहणारे आहेत.
-
-
पोलिसांनी अलकनंदा नदी किनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितलं आहे.
-
-
उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी देखील कोणत्याही अफवा न पसरवण्याचं आवाहन केलंय.
-
-
घटनास्थळावर SDRF ची पथकं पोहचली आहेत. ITBP चेही दोन पथकं या ठिकाणी मदतीला आहेत.
-
-
NDRF ची 3 पथकं देहरादून येथून रवाना झाली आहेत.
-
-
मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत देखील जोशीमठ या ठिकाणी जाण्यासाठी रवाना झालेत.
-
-
धरण फुटल्यानंतर चमोलीपासून ऋषिकेश आणि हरिद्वारपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.
-
-
हरिद्वारचे जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी निर्देश दिल्यानंतर खोलगट भागात असलेली ठिकाणं रिकामी करण्याचं काम सुरु करण्यात आलंय.