दिल्लीत आज सकाळी दाट धुरके पसरले होते. हे दृश्य दिल्लीतल्या जीटी करनाल रोडचे आहे. हवामान खात्याने (आयएमडी) राजधानी दिल्लीत आज दिवसभर 'मध्यम धुरकं' असेल, अशी शक्यता वर्तवली आहे.
बिहारमध्येही अनेक ठिकाणी आज सकाळी दाट धुके पाहायला मिळाले, धुक्यामुळे पाटना शहरात दृश्यमानता कमी झाल्यामुळे बरीच उड्डाणे विस्कळीत झाली.
गोरखपूरमध्ये दृश्यमानता कमी झाल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. दाट धुक्यामुळे सकाळी रस्त्यांवर स्पष्ट काहीच दिसत नव्हतं, त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान अडथळे येत होते. एक कारचालक म्हणाला, 'आम्हाला काहीही स्पष्ट दिसत नाही. ड्रायव्हिंग करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
हरियाणा: आज सकाळी अंबाला परिसर दाट धुक्यामध्ये हरवून गेला होता. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) आज अंबाला येथे ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवला आहे. अंबाला येथे आज किमान 10 अंश आणि कमाल 25 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
पाटना आणि अंबालासारखीच मुरादाबाद शहराची परिस्थिती होती. मुरादाबादमध्ये सकाळी इतकं धुकं होतं की, त्यामुळे वाहतूकही विस्कळित झाली होती. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार मुरादाबादमध्ये किमान तापमान 11 अंश सेल्सियस आणि कमाल तपमान 27 अंश सेल्सियस नोंदवण्यात आले आहे.