मुंबई : हिंदू (Hindu Youth) तरुणांची सेक्सुअल पॉवर कमी करण्याचा जिहाद मुस्लीम तरुणांकडून सुरु आहे, असा खळबळजनक आरोप एका प्रसिद्ध युट्युबरने (You Tuber) केला आहे. ललित सरदाना (Lalit Sardana) असं या युट्युबरचं नाव असून ललित सरदाना ऑनलाईन कोचिंग क्लास घेतात. ते स्पर्धा परीक्षांची तयारी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवतात. आपल्या शिकवणीदरम्यानच्या एका व्हिडीओमध्ये त्यांनी केलेला हा खळबळजनक दावा आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे. मुस्लिम तरुण जाणीवपूर्वक हिंदू तरुणांना पॉर्न किंवा अश्लिल व्हिडीओ दाखवतात. त्याने हिंदू तरुण उत्तेजीत होतात. अशाने ते संभोग करण्यासाठी पार्टनर तरी शोधतात किंवा मग हस्तमैथुन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं जातं. हा एक नवा जिहाद असल्याचं म्हणत ललित सरदाना यांनी वादग्रस्त दावा केला आहे. मोहम्मद जुबेर यांनी ललित सरदाना यांचा व्हिडीओ ट्वीट करत या प्रकरणी सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओवरुन आता चर्चांना उधाण आलं असून सोशल मीडियातून ललित सरदाना यांच्या एकूणच भूमिकेवर शंका घेतलीये.
ललिस सरदाना यांनी आपल्या दोन मिनिटं 20 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये म्हटलंय, की..
लव जिहादवर बोलताना सरदाना यांनी हे वक्तव्य केलंय. लव जिहादमध्ये हिंदू मुलींना मुस्लिम मुलं आपल्या जाळ्यात ओढतात. पण त्याहीपेक्षा भीषण गोष्ट मुस्लिम तरुणांकडून सुरु असल्याचा आरोप त्यांनी केलाय. हिंदू मुलांच्या सेक्शुअल पॉवरला कमी करण्याचा जिहाद सुरु असल्याचा प्रकार सुरु आहे. हा माझा व्हिडीओ तुम्ही सांभाळू ठेवा. तुम्हाला हेच दिसेल. येणाऱ्या दोन वर्षात हा प्रकार सिद्ध होईल, हे नोट करुन ठेवा.
Meet Mr. Lalit Sardana. He has a YouTube channel ‘Sardana Tutorials’ @studyadda, Teaches IIT-JEE advance to students online. Here he explains how ‘Muslim youth’ teach ‘Hindu youth’ to masturbate by showing Adult/Porn movies to reduce their sexual powers. He says, its new #Jihad pic.twitter.com/wylsQ8PqS6
— Mohammed Zubair (@zoo_bear) August 21, 2022
ललीत सरदाना हे एक शिक्षक आहे. ते सरदाना ट्युटोरीअल्स नावाचे एक युट्युब चॅनेल चालवतात. आयआटी जेईई, सीईटी, रेल्वे परीक्षा आणि वेगवेगळ्या बोर्ड परीक्षांसाठीच्या शिकवण्या ते आपल्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून देत असतात. सरदाना पतीपत्नी हे युट्युब चॅनेल चालवतात. त्यांच्या पत्नीचं नाव डॉक्टर श्वेता सरदाना आहे. त्या देखील या युट्युब चॅनेलवरुन शिकवत असतात.
या व्हिडीओमध्ये मागच्या बाजूला फिजिक्स विषयासंदर्भातली काही मुद्दे फळ्यावर लिहिल्याचं दिसून आलं आहे. फिजिक्स शिकवताना त्यांनी केलेली वादग्रस्त विधानं सरदाना यांनी केल्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. आरशाचा उपयोग प्रकाशाचा प्रवास इत्यादी बाबी शिकवत असताना ते अचानक जीवशास्त्राबाबत किंवा थेट बायोलॉजिकल एक्टीव्हीटीवर का बोलू लागले, अशीही शंका घेतली जातेय.