नवी दिल्ली: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मोदी सरकार प्रत्येक देशवासियाच्या बँक खात्यात 75 हजार रुपये जमा करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, तपासाअंती ही गोष्ट खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
केंद्र सरकारने मोदी लोन योजना सुरु केल्याचा दावा या व्हीडिओत करण्यात आला होता. या माध्यमातून देशातील लोकांना रोख पैसे दिले जात असल्याचे व्हिडीओत म्हटले होते. मात्र, PIB Fact Check मध्ये हे वृत्त साफ खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Modi govt scheme distributing 75000 rupees news is fake)
काही दिवसांपूर्वी मोदी सरकार बेरोजगार तरुणांना पैसे देत असल्याची बातमीही व्हायरल झाली होती. सोशल मीडिया आणि व्हॉटसअॅपवर मोदी सरकारच्या नावाने एक मेसेज फिरत होता. त्यामध्ये मोदी सरकार देशातील बेरोजगार तरुणांना (Unemployment) प्रत्येक महिन्याला 3800 रुपयांचा बेरोजगारी भत्ता (Berojgari Bhatta) देणार असल्याचे म्हटले होते. मात्र, तपासाअंती हे वृत्तही खोटे असल्याचे निष्पन्न झाले होते.
दावा: एक #YouTube वीडियो में दावा किया जा रहा है कि केंद्र सरकार द्वारा मोदी लोन योजना के तहत सभी देशवासियों के खाते में ₹75,000 की नगद राशि दी जा रही है। #PIBFactCheck: यह दावा #फ़र्ज़ी है। केंद्र सरकार ने ऐसी कोई घोषणा नहीं की है। pic.twitter.com/2UiDtjwcAI
— PIB Fact Check (@PIBFactCheck) February 2, 2021
असा कुठलाही मेसेज आला तर तुम्ही याची अधिकृत माहिती मिळवू शकता. यासाठी https://factcheck.pib.gov.in/ या वेसबाईटवर किंवा व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा ईमेलः pibfactcheck@gmail.com वर फॅक्ट चेकसाठी पीआयबीला पाठवू शकता. ही माहिती पीआयबी वेबसाइट https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे.
संबंधित बातम्या:
Fact Check: बेरोजगार तरुणांना मोदी सरकार महिन्याला 3800 रुपये देणार?
Fact check | ‘पीएम निवृत्ती वेतन योजने’तून खरंच 70 हजार रुपये मिळणार?
Fact Check | तीन महिने रेशन न घेतल्यास तुमचं रेशन कार्ड रद्द होणार?
Fact Check : मोदी सरकार महिलांच्या खात्यात जमा करणार 60 हजार?
(Modi govt scheme distributing 75000 rupees news is fake)