इंदूर : पावसाळ्याचे दिवस असून ठिकठिकाणी नैसर्गिक धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक जाताना दिसत आहेत. काही ठिकाणं ही ठरलेली असून लोकं अशा ठिकाणी गर्दी करतात. तर काही लोकांची मस्ती त्यांच्या अंगाशी येते. अनेकदा अनुचित प्रकार घडतात आणि जीवही गमवावा लागतो. मध्य प्रदेशातील इंदुर येथील लोधिया कुंडाजवळ असाच एक धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ उपस्थित असलेल्या पर्यटकाच्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाला असून सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सुमित मॅथ्यू नावाच्या तरुणाने योग्य वेळी पाण्यात उडी घेतली नसती तर कदाचित बापलेकीच्या जीवावर बेतलं असतं. पण सुमित मॅथ्यू देवासारखा धावून आला आणि दोघांचा जीव वाचला.
सुमित मॅथ्यु याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकता की लाल रंगाची कार वरून थेट पाण्यात पडली. या कारण बापलेक होती. गाडी खाली पडताना त्यातून तिचे वडील बाहेर पडले आणि थेट पाण्यात गेले. त्यांना पोहता येत नसल्याचं दिसत आहे आणि ते पाण्यात बुडत होते. तर मुलगी गाडीतच अडकली होती.
#WATCH मध्य प्रदेश: इंदौर के पास लोधिया कुंड झरने में एक कार गिरी। वहां उपस्थित लोगों ने कार में मौजूद पिता और बेटी को डूबने से बचाया।
(वीडियो सोर्स: सुमित मैथ्यू) pic.twitter.com/kgIeBgHgN1
— ANI_HindiNews (@AHindinews) August 7, 2023
“मी एक गाडी वरून खाली पडताना पाहिली. अंकल गाडीतून बाहेर पडले होते पण त्यांची मुलगी गाडीतच अडकली होती.मी जेव्हा त्यांना पाहिलं तेव्हा मी पाण्यात उडी घेतली आणि त्या काकांना बाहेर काढलं. काही लोकं तिथे ऑफरोडिंग करत गाडी तेथे आणतात. दोन्ही मुली आणि वडील सुरक्षित आहेत.”, असं देवदूत ठरलेल्या सुमित मॅथ्यू याने सांगितलं.
सुमित मॅथ्यू याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. देवदूतासारखा धावून आल्याने त्याच्या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. तसंच हा व्हिडीओ पाहून अनेकांनी अशी कृती करणाऱ्या वडिलांना खडेबोल सुनावले आहेत.