दिल्ली – उत्तर गोलार्धातील (Northern Hemisphere) विषुववृत्ताच्या वरच्या भागात राहणारे लोक हे दुर्मिळ दृश्य पाहू शकतील. भारतातील लोकांनाही हे दृश्य पाहता येणार आहे. हा दृष्टिकोन पाहता आकाशातील प्रदूषणाचे (Pollution) प्रमाण कमी व्हायला हवे. हे दृश्य पाहण्यासाठी सूर्योदयाच्या (sunrise) एक तास आधी पूर्वेकडे आकाशाकडे पहावे लागेल.
Saturn, Mars, Venus&Jupiter will align in a parade this week. It’s a rare combination, same took place in 947 AD*. It can be seen with naked eye. Will appear in eastern sky before an hr the sunrise:Dr S Pattnaik, Dy Director, Pathani Samanta Planetarium on planetary parade(26.04) pic.twitter.com/5ifIq138ag
— ANI (@ANI) April 26, 2022
विषुवृत्ताच्या उत्तरेला असलेल्या लोकांना, देशांना हे दुर्मिश दृश्य पहाण्याची संधी मिळणार आहे. भारतातही हे दृश्य दिसणार आहे. विशेष म्हणजे ह्या दुर्मिळ क्षणांचे साक्षीदार व्हायचं असेल तर तुम्हाला सूर्योदयाच्यापुर्वी झोपेतून लवकर उठावे लागेल आणि पूर्वेकडे पहावे लागेल. तेही तासभर अगोदर तरच हा दुर्मिळ क्षण पहाण्याचा आनंद घेता येईल. उशीरा उठणाऱ्यांना जसा सूर्योदय कधीच लाभत नाही तसाच हा ऐतिहासिक क्षणही लाभणार नाही.