नवी दिल्ली : भारत हा कृषीप्रधान देश (Agricultural Country) आहे. येथील 70 टक्के जनता ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल अशा योजनांवर राज्य आणि केंद्राकडून काम केलं जात आहे. त्यातीलच एक प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजना (PM Kisan Yojana) ही अशीच एक योजना आहे. केंद्र सरकार पीएम किसान 11 चा हप्ता लवकरच जारी करणार आहे. PM किसान 11 व्या हप्त्याच्या रिलीजच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी, अहवालानुसार, 31 मे 2022 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी जमा होऊ शकतो. त्यामुळे पीएम किसान योजनेच्या 12 कोटी 56 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा आधार मिळणार आहे. तर 11 वा हप्ता येण्यापूर्वी सरकारने ई-केवायसी (e-KYC) करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
ही योजना 1 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. त्याअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना 6000 रुपये आर्थिक मदत देण्याची चर्चा होती. हा पैसा आजही शेतकऱ्यांना किमान उत्पन्नाच्या आधारे सरकारमार्फत मिळतो. 1 फेब्रुवारी 2019 रोजी भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2019 दरम्यान पियुष गोयल यांनी ही योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात पैसे दिले जाते. या योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 10 हप्ते मिळाले आहेत. तर आता 11 व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, केंद्र सरकारने 1 जानेवारी 2022 रोजी 11,11,87,269 शेतकऱ्यांना 10 व्या हप्त्याचा लाभ दिला होता. त्यानंतर 2000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले.
प्रधानमंत्री श्री @narendramodi 31 मई, 2022 को शिमला में ‘पीएम किसान सम्मान निधि’ की 11वीं किस्त जारी करेंगे एवं लाभार्थियों के साथ संवाद करेंगे।
लाइव देखें:
• https://t.co/ZFyEVldUYK
• https://t.co/vpP0MInUi4
• https://t.co/lcXkSnNPDn
• https://t.co/jtwD1z6SKE pic.twitter.com/5QxmltkEWq— BJP (@BJP4India) May 30, 2022
वेळापत्रकानुसार या योजनेचा 11वा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान शेतकर्यांना मिळणार होता. यासाठी जवळपास 80 टक्के शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली आहे. याआधी 31 मार्च ही अंतिम तारीख होती. मात्र ती वाढवून 31 मे करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याचे मानले जात आहे.
तुम्ही लहान असो वा अल्पभूधारक शेतकरी, जर कुटुंबातील सदस्याने कर भरला असेल तर तुम्ही या योजनेच्या लाभापासून वंचित राहाल. कुटुंबातील सदस्य म्हणजे पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले. याशिवाय ज्यांच्याकडे शेतीयोग्य शेतजमीन आहे, सरकारी कर्मचारी आहेत ते या सुविधेचा लाभ मिळू शकत नाही.
पीएम किसान सन्मान निधी योजना मोदी सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू केली होती. या योजनेअंतर्गत मोदी सरकार प्रत्येक आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना 2000-2000 च्या तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये देत आहे. दरवर्षी पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो.