Video| ऑस्ट्रेलियातून भारतात आणलेल्या 29 प्राचीन मूर्तींची मोदींकडून पाहणी, पंतप्रधान स्कॉट मॉरिसनसोबत आज व्हर्चुअल बैठक

| Updated on: Mar 21, 2022 | 11:27 AM

ऑस्ट्रेलियातून (Australia) भारतात आणल्या गेलेल्या 29 प्राचीन मूर्तींची (29 antiquities) पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केली आहे. या मूर्तींचे थिमनुसार सहा गटात वर्गीकरण करण्यात आले आहे.

Video| ऑस्ट्रेलियातून भारतात आणलेल्या 29 प्राचीन मूर्तींची मोदींकडून पाहणी, पंतप्रधान स्कॉट मॉरिसनसोबत आज व्हर्चुअल बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी मूर्तींची पाहणी करताना
Follow us on

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातून (Australia) भारतात आणल्या गेलेल्या 29 प्राचीन मूर्तींची (29 antiquities) पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केली आहे. या मूर्तींचे थिमनुसार सहा गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. या मूर्तींमध्ये विविध देवी देवतांच्या मूर्तींचा समावेश आहे. या मूर्ती अतिशय प्राचीन कालखंडामधील आहेत. ज्यामध्ये भगवान शंकर आणि त्यांचे शिष्य, जौन परंपरांशी संबंधित असलेल्या मूर्ती, प्राचीन काळात गृहसजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या मूर्ती आणि भारतातील विविध राज्यांच्या सांस्कृतीक वारश्याची जाणीव करून देणाऱ्या मूर्तींचा समावेश आहे. यातील एका मूर्तीमध्ये भगवान शंकर हे आपल्या शिष्यांसोबत सवांद साधत असलेला प्रसंग चित्रित करण्यात आला आहे. या मूर्ती खडक, संगमरवर तसेच कास्य, पितळाच्या धातूपासून बनवण्यात आल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. या मूर्ती भारतातील राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगाना आणि पश्चिम बंगाल या राज्यातील संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात.

मोदींच्या काळात सर्वाधिक पुरातन वस्तू भारतात आणल्या

दरम्यान एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार मोदींच्या काळात सर्वाधिक पुरातन वस्तू परेदशातून भारतात आणल्या गेल्या आहेत. 1976 पासून ते 2021 पर्यंत परदेशातून भारतात एकूण 54 दुर्मीळ आणि पुरातन वस्तू भारतात आणल्या गेल्या. त्यातील तब्बल 41 वस्तू या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात परत आणल्याचा दावा परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने करण्यात आला आहे. आता त्यात आणखी या मूर्तीची भर पडली आहे. ऑस्ट्रेलियामधून भारतात आणल्या गेलेल्या या मूर्ती अतिशय प्राचीन आणि दुर्मीळ असल्याची माहिती पीएमओ कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

आज भारत- ऑस्ट्रेलिया व्हर्चुअल शिखर संमेलन

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याशी संवाद साधणार आहेत. व्हर्चुअल पद्धतीने हे शिखर संमेलन पार पडणार आहे. या बैठकीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारतादरम्यानचा व्यापार, गुंतवणूक, राजकीय संबंध, परराष्ट्रीय स्थरावरील रणनिती आशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत आणि ऑस्ट्रेलियातील संबंध अधिक मजबून बनवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन भारतात 1,500 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीची घोषणा करू शकतात.

 

संबंधित बातम्या

Goa Government Formation: सावंत आले तरी राणे दिल्लीतच, गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम?

जयंती विशेष : रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज

कोळसा घोटाळा प्रकरण : तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जींच्या मागे ईडीपिडा; सोमवारी चौकशी