नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेत उत्तर दिलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विचार प्रकट करणाऱ्या सर्व पक्षांच्या सदस्यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना श्रद्धांजली अर्पण करुन केली. ‘देशानं आदरणीय लता दीदीला गमावलं आहे. एवढा मोठा काळ ज्यांच्या आवाजाने देशाला मोहित केलं, देशाला प्रेरित केलं, देशाला भावनांनी भरलं. मी आज आदरणीय लतादीदींना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो’, असं मोदी म्हणाले. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी कोरोना संकटाच्या (Corona Outbreak) काळात पहिल्या लाटेवेळी कामगारांच्या स्थलांतरावरुन महाराष्ट्र, दिल्ली सरकार आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘कोरोनाच्या पहिल्या लाटेत देश जेव्हा लॉकडाऊनचं पालन करत होतं. who सल्ला देत होतं. तज्ज्ञ म्हणत होते की जो तिथे आहे तिथेच थांबा. कारण माणूस एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी जात असेल आणि तो कोरोना संक्रमित असेल तर त्याच्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. तेव्हा काँग्रेसनं काय केलं, तर मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर उभं राहून लोकांना मुंबई सोडून जाण्यासाठी प्रोत्साहित केलं. कामगार, मजुरांना तिकीटं देण्यात आली. लोकांना प्रेरित करण्यात आलं. महाराष्ट्रात आमच्यावर जो बोज आहे तो जरा कमी व्हावा. तुम्ही जा… तुम्ही उत्तर प्रदेशचे आहात. तुम्ही बिहारचे आहात. जा… तिथे कोरोना पसरवा. तुम्ही हे मोठं पाप केलं. अफरातफरीचं वातावरण निर्माण केलं. कामगार बांधवांना अनेक कठीण प्रसंगात ढकलून दिलं’, अशी घणाघाती टीका पंतप्रधान मोदी यांनी केलीय.
PM Shri @narendramodi‘s reply to the Motion of Thanks on the President’s address in Lok Sabha.
https://t.co/3n1B2RIuxD— BJP (@BJP4India) February 7, 2022
दिल्लीतील सरकारनं तर गाड्यांवर माईक, स्पीकर लावून झोपडीत राहणाऱ्या कामगार, मजुरांना त्यांच्या गावी जाण्यास सांगितलं त्यांच्यासाठी बसेस दिल्या. पण त्यांना अर्ध्या रस्त्यात सोडून त्यांच्यासमोर अडचण निर्माण केली. त्याचं कारण असं झाली की उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबमध्ये कोरोनाचा जास्त प्रसार नव्हता. पण तिथे कोरोना संकट वाढवण्याचं पाप काँग्रेसनं केलं, असा गंभीर आरोप पंतप्रधान मोदी यांनी केलाय.
तब कांग्रेस के लोगों ने मुंबई के रेलवे स्टेशन पर खड़े रहकर मुंबई के श्रमिकों को जाने के लिए उनको टिकट दिया गया, लोगों को जाने के लिए प्रेरित किया गया।
– पीएम @narendramodi
— BJP (@BJP4India) February 7, 2022
त्याचबरोबर पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘दुसऱ्या महायुद्धानंतर जगात मोठा बदल झाला. मी स्पष्टपणे पाहतोय की कोरोना संकटानंतर जग एक नव्या व्यवस्थेकडे पुढे जात आहे. एक असा टर्निंग पॉईट आहे. आपण भारताच्या रुपाने ही संधी गमावता नये. भारताने एका लिडरशिप रोलमध्ये स्वत:ला कमी समजलं नाही पाहिजे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही एक संधी आहे. देश जेव्हा स्वातंत्र्याची शंभरी साजरी करेल तेव्हा आपण सामर्थ्यवान होऊ हा संकल्प केला पाहिजे’, असा विश्वासही मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
”वो जब दिन को रात कहें, तो तुरंत मान जाओ।
नहीं मानोगे तो वो दिन में नकाब ओढ़ लेंगे।
जरूरत हुई तो हकीकत को थोड़ा बहुत मरोड़ लेंगे,
वो मगरूर हैं खुद की समझ पर बेइंतहा, इन्हें आईना मत दिखाओ, वो आईने को भी तोड़ देंगे।” pic.twitter.com/bPKl5AM5pD
— BJP (@BJP4India) February 7, 2022
‘गेल्या काही वर्षात अनेक क्षेत्रात आपण मजबुतीने पुढे आलो. पीएम आवास योजना, गरीबांना राहण्यासाठी घरे असावे. हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. पण आपण त्याला गती दिली. त्यामुळे गरीबांचे घर सुद्धा लाखोंपेक्षा अधिक किमतीचे होत आहे. ज्या गरीबाला पक्के घर मिळते तोही लखपतीच्या श्रेणीत येतो. गरीबांच्या घरात शौचालये आले आहेत. त्यामुळे उघड्यावर शौच करणं बंद झालं आहे. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर गरीबाच्या घरात उजेड आला तर त्याचा आनंद देशाचा आनंद वाढवतो. गरीबाच्या घरात गॅस कनेक्शन असेल, चुलीमुळे होणाऱ्या धुरापासून त्याला मुक्ती मिळेल तर त्याच्या चेहऱ्यावरील आनंद वेगळाच असतो, असंही मोदी यावेळी म्हणाले.
आजादी के इतने सालों के बाद गरीब के घर में रोशनी होती है, तो उसकी खुशियां देश की खुशियों को ताकत देती हैं।
गरीब के घर में गैस का कनेक्शन हो, धुएं वाले चूल्हे से मुक्ति हो तो उसका आनंद कुछ और ही होता है।
– पीएम @narendramodi
— BJP (@BJP4India) February 7, 2022
इतर बातम्या :