भारताच्या चहाची बदनामी करण्यासाठी परदेशातून षडयंत्र रचलं जातंय : पंतप्रधान मोदी

| Updated on: Feb 07, 2021 | 9:02 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसाममधील एका सभेत गंभीर आरोप केलाय. भारताच्या चहाला बदनाम करण्यासाठी परदेशातून मोठं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप केलाय.

भारताच्या चहाची बदनामी करण्यासाठी परदेशातून षडयंत्र रचलं जातंय : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

दिसपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसाममधील एका सभेत गंभीर आरोप केलाय. भारताच्या चहाला बदनाम करण्यासाठी परदेशातून मोठं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप केलाय. तसेच देशातील काही लोक परदेशातील या षडयंत्राला मूक संमती देत असल्याचाही आरोप मोदींनी केलाय. त्यामुळे मोदी नेमका कुणाकडे इशारा करत आहेत याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत (PM Narendra Modi allege international conspiracy to malign Indian Tea).

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “देशाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातंय. षडयंत्र करणारे इतक्या स्तरावर पोहचले आहे की ते भारताच्या चहाला जगभरात बदनाम करण्यासाठी कट रचत आहेत. हे षडयंत्र फार नियोजनबद्ध पद्धतीने होत आहे. काही कागदपत्रं समोर आली आहेत. यानुसार परदेशातील काही लोक चहाला आणि लोकांच्या त्याच्यासोबत असलेल्या नात्याला बदनाम करण्याचा कट रचत आहेत. तुम्ही हे पाहून शांत बसणार आहात का? जे या परदेशींना भारतावर हल्ला करण्यास मदत करत आहेत त्यांची साथ द्याल का?”

“प्रत्येकाला उत्तर द्यावं लागेल. जे लोक मौन राहून चहाला बदनाम करणाऱ्या परदेशींना मदत करत आहेत त्यांना देखील यावर उत्तर द्यावं लागेल. इथं उपस्थित असलेला प्रत्येक चहाच्या बागात काम करणारा षडयंत्र करणाऱ्यांना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना चोख उत्तर मिळेल. कट रचणाऱ्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना भारताच्या चहाला बदनाम करता येणार नाही,” असंही मोदी म्हणाले.

‘या’ लोकांकडून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

मागील काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला अनेक आंतरराष्ट्रीय व्यक्तींनी पाठिंबा दिलाय. नुकताच अमेरिकेची पॉप गायिका रिहाना, स्वीडनची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, अमेरिकेची अभिनेत्री अमांडा केरनी, गायक जे. सीन, डॉ. जियस, माजी पॉर्नस्टार मिया खलिफा, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिससह अनेकांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

शेतकरी आंदोलनाचा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्याने मोदी सरकारची जागतिक स्तरावर कोंडी झाल्याचं बोललं जातयं. म्हणूनच एकिकडे सरकार कायदे मागे घेणार नाही, अशी ताठर भूमिका घेतंय, तर दुसरीकडे चर्चेचं आवाहन करत असल्याचं बोललं जातंय. याच पार्श्वभूमीवर मोदींनी आसाममध्ये हे वक्तव्य केलंय. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय.

हेही वाचा :

मोदीजी हे वागणं बरं नव्हं, फडणवीसजी त्यांना योग्य सल्ला द्या: जयंत पाटील

LIC IPO Latest news : तुमची एलआयसी पॉलिसी दिवाळी गोड करणार?

भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा केंद्राचा डाव; राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

व्हिडीओ पाहा :

PM Narendra Modi allege international conspiracy to malign Indian Tea