‘मी मुख्यमंत्री होतो तेव्हा…’, पंतप्रधानांनी मनमोहन सिंग यांच्या जागवल्या आठवणी, काय म्हणाले नरेंद्र मोदी?

| Updated on: Dec 27, 2024 | 12:04 PM

PM Narendra Modi : सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती ते नावाजलेले अर्थतज्ज्ञ अशी ओळख डॉ. मनमोहन सिंग यांनी कमावली. त्यांनी अर्थमंत्री म्हणून ते सरकारच्या इतर अनेक खात्याची पदभार सांभाळला. त्यांनी देशाच्या आर्थिक धोरणावर दूरगामी परिणाम केले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मी मुख्यमंत्री होतो तेव्हा..., पंतप्रधानांनी मनमोहन सिंग यांच्या जागवल्या आठवणी, काय म्हणाले नरेंद्र मोदी?
नरेंद्र मोदी यांनी जागवल्या आठवणी
Follow us on

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर भारतातूनच नाही तर जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांच्या आठवणी जागवल्या. त्यांनी शुक्रवारी डॉ. सिंग यांच्या घरी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी यावेळी शोक व्यक्त केला. पंतप्रधान म्हणून त्यांनी देशातील लोकांचे जीवन अधिक चांगले करण्याचा व्यापक प्रयत्न केला. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती ते नावाजलेले अर्थतज्ज्ञ अशी ओळख डॉ. मनमोहन सिंग यांनी कमावली. त्यांनी अर्थमंत्री म्हणून ते सरकारच्या इतर अनेक खात्याची पदभार सांभाळला. त्यांनी देशाच्या आर्थिक धोरणावर दूरगामी परिणाम केले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

त्यावेळी मी मुख्यमंत्री

यावेळी पंतप्रधानांनी त्यांच्याविषयीच्या आठवणी जागवल्या. डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान पदी असताना आपण गुजरातचे मुख्यमंत्री होतो. तेव्हा आमच्या दोघात नियमीत चर्च व्हायची. सरकारच्या विविध धोरणं, विषयावर आमची चर्चा व्हायची अशी आठवण त्यांनी जागवली. त्यांची बुद्धिमत्ता आणि विनम्रता नेहमी पाहायला मिळायची अशी आठवण त्यांनी सांगितली.

हे सुद्धा वाचा

जनतेचे जीवन सुखकर करण्यासाठी व्यापक प्रयत्न

सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती ते नावाजलेले अर्थतज्ज्ञ अशी ओळख डॉ. मनमोहन सिंग यांनी कमावली. त्यांनी अर्थमंत्री म्हणून ते सरकारच्या इतर अनेक खात्याची पदभार सांभाळला. त्यांनी देशाच्या आर्थिक धोरणावर दूरगामी परिणाम केले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. संसदेत त्यांनी मांडलेले मुद्देही व्यावहारिक असत. पंतप्रधान म्हणून त्यांनी जनतेचे जीवन सुखकर करण्यासाठी व्यापक प्रयत्न केल्याचा उल्लेख मोदी यांनी केला.

उत्तम मार्गदर्शक गमावला

तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक संवेदना व्यक्त केल्या. त्यांनी अफाट बुद्धी आणि सचोटीच्या जोरावर देशाचे नेतृत्व केले. त्यांची अर्थशास्त्राबद्दल असलेली सखोल जाणिवेतून राष्ट्राला प्रेरणा मिळाली. श्रीमती कौर आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. आपण एक गुरु आणि उत्तम मार्गदर्शक गमावला, असे ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.