नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे रविवारी आपल्या दोन दिवसीय जापान दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यात ते क्वाड समुहाच्या (Quad Sunnit) दुसऱ्या शिखर संमेलनात सहभागी होतील. क्वाड समुहात भारत, अमेरिका, जापान आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. जापानला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले की ते जापानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरुन जापान दौऱ्यावर जात आहेत.
पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी एकूण 40 तास जापानमध्ये असतील. यावेळी ते एकूण 23 कार्यक्रमात सहभागी होतील आणि महत्वाच्या बैठका घेतील. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी जापानमधील 35 प्रमुख व्यावसायिकांशीही चर्चा करणार आहेत. यावेळी जापनमधील कंपन्यांचे CEO आणि अध्यक्षही उपस्थित असतील.
PM @narendramodi Departs for Japan to Participate in QUAD Summit l @PMOIndia @ianuragthakur @Murugan_MoS @PIB_India @DDNewslive @DDIndialive @airnewsalerts @AmritMahotsav @mygovindia pic.twitter.com/GXVGRm6eJt
— Ministry of Information and Broadcasting (@MIB_India) May 22, 2022
पंतप्रधान मोदी यांनी रविवारी आपल्या जापान दौऱ्याबाबत प्रतिक्रिया दिली होती. पंतप्रधान मोदी म्हणाले की जापानमध्ये क्वाड नेत्यांसोबत हे दुसरं शिखर संमेलन आहे. या संमेलनाच्या माध्यमातून जापान, भारत, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाला क्वाड समुहाद्वारे करण्यात आलेल्या प्रयत्नांची समीक्षा करता येईल.
PM visit to Japan | Prime Minister Narendra Modi will reach Tokyo on 23rd May. He will attend the Indo-Pacific Economic Framework event. PM will also participate in a roundtable with Japanese business leaders & will also interact with the Indian community.
(File pic) pic.twitter.com/BJmQQ1G2Ct
— ANI (@ANI) May 22, 2022
पंतप्रधान मोदींनी सांगितल्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान एन्थनी अल्बानीज पहिल्यांदाच क्वाड नेत्यांच्या शिखर संमेलनात सहभागी होतील. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चेसाठी उत्सुक असल्याचंही मोदी म्हणाले. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान विविध क्षेत्रात सहकार्य आणि वैश्विक मुद्द्यांवर चर्चा होईल, असंही मोदी म्हणाले.