लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. रविवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनमध्ये शपधविधी सोहळा पार पडला. नरेंद्र मोदी यांच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एकूण 71 खासदारांनी शपथ घेतली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेणारे नरेंद्र मोदी ठरले आहेत. शपधविधी सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र या सोहळ्यामधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शपधविधी सुरू असताना राष्ट्रपती भवनामध्ये बिबट्या फिरत असलेला पाहायला मिळाला.
राष्ट्रपती भवन परिसरात सुरू असलेल्या शपधविधीवेळी नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यावर इतर मंत्री शपथ घेत होते. मंत्री दुर्गादास उईके हे शपध घेतल्यावर स्वाक्षरी करत होते. यादरम्यान त्यांच्या पाठीमागून सीसीटीव्ही एक बिबट्या मागून चाललेला दिसत आहे. टीव्ही9 मराठी या व्हिडीओची पुष्ठी करत नाही. पण हा व्हिडीओ सोशल माध्यमांवर तुफान व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.
ये कौन सा जानवर है?
— Govind Pratap Singh | GPS (@govindprataps12) June 10, 2024
व्हायरल व्हिडीओमधील प्राणी नेमका कोणता हे अद्याप काही समोर आलेलं नाही. मात्र तो बिबट्या असल्याचं बोललं जात आहे. प्राण्याच्या आकारावरून तो प्राणी बिबट्या आहे अशी चर्चा आहे. पण जर खरोखरच तो प्राणी बिबट्या असेल तर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा मोठा चिंतेचा विषय आहे. कारण तिथे सुरू असलेला कार्यक्रम हा लहान नाहीतर देशाचे पंतप्रधान शपथ घेत होते. या शपधविधीला परदेशातून पाहुणे आले होते. चुकून तो बिबट्या माघारी आला असता तर मोठा अनर्थ घडला असता.
दरम्यान, नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून सुरक्षा कर्मचारी कुठे होते त्यांना बिबट्या दिसला नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे. सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं असून सर्वांना सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.