नवी दिल्लीः इतिहासातील एखादी घटना कधी, कुठे वेगळं वळण घेईल सांगता येणार आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज इतिहासाच्या पानावर एक नवा अध्याय लिहिणार आहेत. आज सायंकाळी राजपथाचे नाव बदलून कर्तव्य पथ करण्यात येणार आहे. याबरोबरच या सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू (Central Vista Avenue) योजनेंतर्गत इंडिया गेटजवळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचेही अनावरण केले जाणार आहे. इतिहासातील अनेक घटना घडून गेल्यानंतर त्या घड्याळातील काट्याशिवाय आणि त्या काळाशिवाय कोणालाचा माहिती नसतात. इतिहासात त्या घटना का घडल्या, कधी घडल्या आणि त्या घटनांची पार्श्वभूमी काय आहे हे फक्त घड्याळाच म्हणजे घडून गेलेल्या काळाशिवाय कोणालाच माहिती नसतात. याचप्रमाणे आजही इतिहासात एक नवी घटना घडत आहेत, आणि त्याची नोंद भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरली जाणार आहे. असं म्हटलं जातं की या घटनेला नवा आयाम देण्यात फक्त नरेंद्र मोदी हेच खरे सूत्रधार आहेत, म्हणूनच या सर्व घटनेचेही कर्णधारही त्यांनाच म्हटले गेले आहे. आज होणारा बदल हा स्वातंत्र्य भारतातील कित्येक दशकानंतरच्या बदलाचा हे एक भाग आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी 7 वाजता इंडिया गेटच्या मागील बाजूला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 28 फूट उंचीच्या पुतळ्याचेही अनावरणही केले जाणार आहे. ग्रेनाईट दगडापासून बनवलेला हा एक वेगळा पुतळा आहे.
स्वातंत्र्यानंतर गेल्या 61 वर्षापासून कित्येक पिढ्या या मार्गाला राजपथ म्हणून ओळखत होते, मात्र आता येणारी नवी पिढी या मार्गाला कर्तव्य पथ म्हणून ओळखणार आहे. ज्या भारताला जगात ज्या भारताला लोकशाहीचा देश म्हणून ओळखले जाते त्या मार्गाचे नाव आता आजपासून बदलणार आहे. यापूर्वी 1961 मध्ये या रस्त्याचे नाव किंग्स वे असं ब्रिटिशकाली नाव होते, मात्र त्यावेळी हे नाव बदलून ‘राजपथ’ करण्यात आले होते.
कोरोना काळात केंद्र सरकारने 20 हजार कोटी खर्च करुन सेंट्रल व्हिस्टा योजनेला प्रारंभ केला होता. या योजनेंतर्गत, नवीन संसद भवना बरोबरच राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटकडे जाणाऱ्या 3 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर देशाच्या राजधानीला नवं रुप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये केंद्र सरकारचे नवीन सचिवालय, वेगवेगळ्या मंत्रालयांची कार्यालये आणि अनेक सरकारी निवासस्थानेही बांधली जाणार आहेत. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘राजपथ’ ऐवजी ‘कर्तव्यपथ’चे उद्घाटन करणार आहेत.
राजपथाचे नामकरण होत असतानाच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचेही अनावरण केले जाणार आहे. याआधी मोदी सरकारने इंडिया गेटजवळ तेवत असलेली ‘अमर जवान ज्योती’चे राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये विलीन केले होते.
ज्या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवला जाणार आहे, त्या ठिकाणी ब्रिटनचे महाराजा पाचवे जॉर्ज यांचा 1939 मध्ये संगमरवरी पुतळा बसवण्यात आला होता. हा पुतळा स्वातंत्र्यानंतर तेथून हटवण्यात आला आणि 1968 पासून हटवण्यात आला होता. त्यानंतर 1911 मध्ये जॉर्ज पंचम यांचा पुतळा बसवण्यात आला होता, त्या ठिकाणाला आता कॉरोनेशन पार्कही म्हटले जात होते.