नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज जगातील सर्वात लांबीच्या क्रूजला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. फाइव्ह स्टार हॉटेलच्या सुविधा असलेल्या या क्रूजचं नाव गंगाविलास (Gangavilas)आहे. वाराणसी येथून गंगाविलास क्रूजचा प्रवास आज सुरु होईल. वाराणसीतील (Varanasi) रविदास घाट येथून पुढे बिहार, बंगालच्या मार्गाने हे क्रूज बांग्लादेश, त्यानंतर आसाममधील डिब्रूगढला पोहोचेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हर्चुअल पद्धतीने या क्रूजचं उद्घाटन करतील.
32 foreign tourists to be part of World’s #LongestRiverCruise #GangaVilas to be flagged off by Hon’ble PM @narendramodi on January 13th. They will experience India, one of the world’s oldest civilizations & its art, architecture, classical dance, music, flora, fauna & its people. pic.twitter.com/DuqzcJXpV8
— Ministry of Ports, Shipping and Waterways (@shipmin_india) January 12, 2023
आज 13 जानेवारी रोजी हे जहाज वाराणसी येथून रवाना होईल. 51 दिवसांचा प्रवास करून पुन्हा आसाम राज्यातील डिब्रूगढमध्ये पोहोचेल.
– या प्रवासात भारतातली पाच राज्य- उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम तसेच बांग्लादेशातूनही प्रवास करेल. बांग्लादेशमध्ये हे जहाज 15 दिवस थांबेल.
जगातील सर्वाधिक लांबीच्या रिव्हर क्रूजच्या पहिल्या फेरीत स्वित्झर्लंडमधील 32 पर्यटक असतील. जहाजात एकूण ३६ प्रवासी राहण्याची सुविधा आहे.
जहाजात प्रति व्यक्ती 50 हजार रुपये प्रति दिवस असे तिकिट आकारण्यात येत आहे. पण एकदाच 51 दिवसांसाठी बुकिंग करणे अनिवार्य आहे. गरज पडली तर हा प्रवास सोडून जाता येईल.
या क्रूजमध्ये नदी पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे.
The #Cruise Tourists visited the #RamnagarFort and relished its architectural beauty. They were awed by the design of the fort and clicked quite many pictures as souvenirs.#Varanasi #RiverCruise #LongestRiverCruise #Kashi #GangaVilas #ArthGanga #RethinkTourism #UPTourism pic.twitter.com/b4q5k6618Y
— UP Tourism (@uptourismgov) January 11, 2023