नवी दिल्ली : देशात कोरोना स्थिती अधिकाधिक बिकट होत चालली आहे. अशावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी संपूर्ण लॉकडाऊन, विकेंड लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. पण लॉकडाऊन हा अंतिम पर्याय आहे. राज्यांनी लॉकडाऊन हा अंतिम पर्याय म्हणून वापर करा. मायक्रो कंटेन्मेंट झोन बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी राज्य सरकारांना केलं आहे. देशातील जनतेचे प्राण तर आपल्याला वाचवायचे आहेतच. पण त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय. (PM Narendra Modi appeal to all states to keep lockdown as a last Option)
महाराष्ट्र, दिल्ली, झारखंड यांच्यासह अनेक राज्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी कडक लॉकडाऊनची घोषणा करण्याची शक्यता आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे विधान महत्वाचं मानलं जात आहे. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचं केंद्र सरकारकडून यापूर्वीच सांगण्यात आलं होतं. आता पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार केलाय. देशातील जनतेचे प्राण आपल्याला वाचवायचे आहेतच. सोबतच आपल्याला अर्थव्यवस्थेकडेही लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा विचार सर्वात शेवटी व्हावा, असं मोदींनी म्हटलंय.
आज की स्थिति में हमें देश को लॉकडाउन से बचाना है।
मैं राज्यों से भी अनुरोध करूंगा कि वो लॉकडाउन को अंतिम विकल्प के रूप में ही इस्तेमाल करें।
लॉकडाउन से बचने की भरपूर कोशिश करनी है।
और माइक्रो कन्टेनमेंट जोन पर ही ध्यान केंद्रित करना है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 20, 2021
“माझी तरुणांना विनंती आहे. त्यांनी आपल्या सोसायटी, परिसरात छोटी कमिटी बनवून कोव्हिड नियम लागू करण्यासाठी मदत करावी. आपण तसं केलं तर लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता लागणार नाही. स्वच्छता अभियानसाठी पाचवी ते दहावीच्या बालमित्रांनी खूप मदत केली होती. त्यांनी घरच्यांना आणि लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला होता. आज त्यांना मी विनंती करतो, घरात असं वातावरण तयार करा की, घरातील लोक विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रसारमाध्यामांनीही लोकांना सतर्क करण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न आणखी वाढवावे. तसेच लोकांमध्ये भीती आणि अफवा वाढू नये. याची काळजी घ्यायची आहे. आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवलायचं आहे. राज्यांनी शेवटच पर्याय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा”, असं पंतप्रधान म्हणाले.
मेरा युवा साथियों से अनुरोध है की वो अपनी सोसायटी में, मौहल्ले में, अपार्टमेंट्स में छोटी छोटी कमेटियाँ बनाकर COVID अनुशासन का पालन करवाने में मदद करे।
हम ऐसा करेंगे तो सरकारों को न कंटेनमेंट ज़ोन बनाने की ज़रुरत पड़ेगी, न कर्फ़्यू लगाने की, न लॉकडाउन लगाने की: PM
— PMO India (@PMOIndia) April 20, 2021
देशातील शेतकरी, मजूर आणि कामगार वर्गाचं लसीकरण करा, असं आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी राज्य सरकारांना केलं आहे. त्याचबरोबर कामगारांना आहे त्याच ठिकाणी रोखून ठेवण्याची व्यवस्था करा. त्यांचा विश्वास द्या. जेणेकरुन कामगारांचं लसीकरण होईल आणि त्यांना आहे त्याच ठिकाणी काम मिळेल, असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलंय.
संबंधित बातम्या :
PM Narendra Modi Bhashan Highlights : कोरोनाचं तुफान उधळून लावू, देश लॉकडाऊनपासून वाचवू : मोदी
PM Narendra Modi appeal to all states to keep lockdown as a last Option