PM Vishwakarma Yojana : झटक्यात लखपती व्हा… ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेचा लाभ कसा मिळवाल ? ही कागदपत्रं आहेत का? पटापट तपासा…

| Updated on: Sep 20, 2024 | 1:51 PM

PM Vishwakarma Yojana : देशातील 140 हून अधिक जातींच्या लोकांना लाभ देण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली. या योजनेचा आज वर्षपूर्ती सोहळा असून पंतप्रधान मोदी या योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधत आहेत.

PM Vishwakarma Yojana : झटक्यात लखपती व्हा... ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेचा लाभ कसा मिळवाल ? ही कागदपत्रं आहेत का? पटापट तपासा...
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्तर ते वर्धा येथील कार्यक्रमात सहभागी होऊन योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधत आहेत. ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदी या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि ऋणपत्र देतील. गेल्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी कारागीर आणि शिल्पकारांना मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पंतप्रधान मोदी 18 प्रकारच्या व्यवसायातील 18 लाभार्थ्यांना ऋणपत्रांचे वितरण करणार आहेत. तसेच पंतप्रधान एक टपाल तिकीटही जारी करतील.

काय आहे पीएम विश्वकर्मा योजना ?

देशातील 140 हून अधिक जातींच्या लोकांना लाभ देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली होती. या योजनेद्वारे कारागिरांना कमी व्याजदरात 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. या योजनेत 17 हून अधिक कारागीर आणि पारंपरिक कामगारांचा सहभाग आहे.

पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ कसा मिळवाल ?

– प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत विश्वकर्मा समाजातील 140 हून अधिक जातींचा समावेश करण्यात आला आहे.

– योजनेचा लाभ फक्त कारागिरांनाच दिला जातो.

– केवळ कुशल कारागीर आणि कारागीर या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.

– मात्र अर्जदाराच्या कुटुंबातील कोणीही सदस्य सरकारी नोकरीतील नसावा.

– अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती कर भरत नसेल तर या योजनेसाठी पात्र ठरू शकतात.

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी कोणती कागदपत्रं आवश्यक ?

या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे आधार कार्ड, बँक पासबूक, चालू असलेला मोबाईल नंबर, जाती प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, तसेच पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्र असणं आवश्यक आहे.

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

– कॉम्प्युटरवर पीएम विश्वकर्मा योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन करा.

– होम पेजवर पोहोचल्यानंतर नवीन नोंदणी ( new registration) पर्यायावर क्लिक करा.

– एक नवे पेज उघडेल, तेथे तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर रजिस्टर करून कॅप्चा कोड भरावा.

– ओटीपीच्या ऑप्शनवर क्लिक करा.

– त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकून व्हेरीफाय करावे.

– नंतर तुमचा आधार नंबर टाकून फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

– ऑथेंटिकेशन पूर्ण झाल्यावर स्क्रीनर ( योजनेचा) अर्ज उघडेल.

– अर्जात विचारण्यात आलेली सर्व माहिती नीट, सविस्तर भरावी.

– आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.

– शेवटी फायनल सबमिट ऑप्शनवर क्लिक करावे. नंतर तुम्हाला रिसीट ( पावती) मिळेल.