नवी दिल्ली / 21 जुलै 2023 : अवैध रितीने भारतात दाखल झालेली पाकिस्तानची सीमा हैदर (Seema Haider) हिच्याबद्दल सुरक्षा यंत्रणांचा संशय बळावत चालला आहे. सीमा आणि सचिनचं प्रेम प्रकरण आता वेगळ्याच वळणावर येऊन ठेपलं आहे. सीमाने यूपी एटीएसला दिलेल्या माहितीत बरीच अनियमितता आढळली आहे. त्याच वेळी सीमाची चौकशी करताना तिच्या अस्खलित इंग्रजीमुळे (englsih speaking) पोलिसही अवाक् झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान सीमा हैदर हिला इंग्रजीच्या काही ओळी वाचण्यास सांगण्यात आल्या होत्या. तिने कोणतीही चूक न करता, अगदी सहजपणे इंग्रजी वाचले.
विशेष म्हणजे आपण अशिक्षित, निरक्षर आहोत, असा दावा सीमाने केला होता. मग असे असतानाही एक निरक्षर महिला इंग्रजी इतकं चांगलं कस वाचू शकते, हाच प्रश्न तपास यंत्रणांना पडला आहे.
नेपाळच्या पशुनाथ मंदिरात आपण सचिनसोबत लग्न केलं असा दावा सीमाने केला होता. मात्र ते पूर्णपणे खोटं असल्याचं समोर आलं आहे. तेथील रजिस्टरमध्ये सीमा आणि सचिन या नावाच्या कोणत्याही जोडप्याच्या लग्नाचे काही पुरावे मिळाले नाहीत. PUBG गेमच्या माध्यमातून सीमा भारतातील इतर अनेक लोकांच्या संपर्कात असल्याचेही पोलिस सांगतात. विशेष म्हणजे सीमाचे बहुतांश मित्र हे दिल्ली-एनसीआरमधील आहेत. त्यामुळेच एटीएसचा तिच्यावरचा संशय अधिक वाढला आहे.
खोट्या नावाने नेपाळमध्ये 7 दिवस थांबले
सीमा हैदर प्रकरणात महत्त्वाचे खुलासे होत आहे. सीमाने 2022 साली जानेवारीच्या सुरूवातीलाच भारत घुसण्याची योजना आखली होती,असे उत्तर प्रदेश पोलिसांनी बुधवारी एका निवेदनात नमूद केलं. या वर्षी मार्च महिन्यात ती नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडू शहरातील एका हॉटेलमध्ये सचिन मीणा याला भेटली आणि खोट्या नावाने ते सात दिवस तेथे राहिले. त्यानंतर मे महिन्यात सीमा हैदरने टूरिस्ट व्हिसा मिळवला आणि कराचीहून दुबई आणि नंतर काठमांडू येथे आली. सचिनसोबत ती लखनऊ, आग्रा मार्गे ग्रेटर नोएडा येथे आली, तेथे रबूपुरा भागात सचिनने एक घर भाड्याने घेतलं होतं.
ISI लिंक बद्दल काय म्हणाले पोलीस ?
सीमा हैदर हिला पाकिस्तानात परत पाठवण्यात येईल असे पोलिसांनी स्पष्ट केले. ISI या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेशी (तिचा) संबंध असल्याच्या प्रश्नाबाबत ते म्हणाले, सर्व एजन्सीज त्यांचे काम करत आहेत. हा दोन देशांशी संबंधित मुद्दा आहे. कोणताही ठोर पुरावा मिळत नाही तोपर्यंत या मुद्यावर काहीही बोलणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सीमा हैदर प्रकरणात महत्त्वाचे खुलासे होत आहे. तपास यंत्रणा या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.