मुंबई : अनेकदा प्रयत्न करूनही यश मिळत नाही. त्याची विविध कारणं देखील असतील पण काही व्यक्तींचे प्रयत्न आणि त्याला असलेली नाशिबाची साथ ही इतिहास घडवणारी ठरत असते. असंच यश एका हरियाणा येथील महिलेला मिळालेले आहे. तीच्या यशाची कहाणी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. पोलीस शिक्षिका ते थेट आयपीएस अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास अनेकांना तोंडात बोट घालायला भाग पाडत असणार यामध्ये शंका नाही. काही दिवसांपूर्वी आयपीएस झालेल्या पूनम दलाल या महिलेच्या यशाची ही कहाणी आहे. विशेष म्हणजे यूपीएससी परीक्षा देतांना पूनम दलाल ह्या गरोदर होत्या. पूनम यांचे आईवडील हे हरियाणाचे असले तरी पूनम यांचा जन्म दिल्लीत झाला असून लहानाच्या मोठ्या त्या दिल्लीतच झाल्या असून शिक्षणही दिल्ली येथेच झाले आहे.
हरियाणा येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील पूनम या दिल्लीत शिकल्या आहेत. 2002 मध्ये त्यांचे बारावीचे शिक्षण पूर्ण झाले होते, त्यांनंतर काही कोर्स करून त्या एमसीडी येथे शिक्षिका बनल्या होत्या.
शिक्षिकेची नोकरी करत असतांना पूनम यांनी पदवी प्राप्त केली. दोन वर्षे शिक्षिकेची नोकरी करून पूनम यांनी नियमित पुन्हा अभ्यास सुरू केला होता.
पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बँकेच्या क्षेत्रात नोकरी करायचे पूनम यांनी ठरविले होते त्यावरून त्यांनी बँकेच्या पीओ म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर या परीक्षेची तयारी केली, त्यात त्या पास झाल्याने आणि एसबीआयमध्ये त्या पीओ म्हणून जॉइन देखील झाल्या.
बँकेत नोकरी करत असतांना पूनम यांनी दुसरीकडे आपला अभ्यास सुरूच ठेवला होता, 3 वर्षे बँकेत काम केल्यानंतर त्यांनी आयकर विभागाच्या परीक्षा दिल्या त्यात त्यांना यश आले आणि तिथेही त्यांनी नोकरी केली.
मिळणारे यश पाहता पूनम दलाल यांचा आत्मविश्वास वाढला होता, पण त्यातच 2007 मध्ये पूनम दलाल यांचा विवाह झाला. कस्टम एक्साइज विभागात काम करणाऱ्या असीमशी त्यांचा विवाह झाला होता.
संसार सुरू झालेला असतांना त्यांनी अभ्यास मात्र सोडला नाही, पतीच्या मदतीने पुन्हा यूपीएससीचा अभ्यास सुरूच ठेवला आणि त्यात त्या गरोदर राहील्या आणि त्याच वेळेला त्यांची परीक्षा देखील आली.
पण त्यांनी परीक्षा दिली आणि त्यात पूनम उत्तीर्ण देखील झाल्या, पण वेगळा विभाग मिळाल्याने पूनम नाराज झाल्या होत्या त्यांनी दुसऱ्यांदा परीक्षा दिली तेव्हा त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.
परीक्षा दिली तेव्हा त्या नऊ महिन्यांच्या गरोदर होत्या नंतर तीन महिन्यांचे बाळ असतांना मुख्य परीक्षा पास झाल्या होत्या, त्यामुळे मोठी तारेवरची कसरत करून पूनम दलाल या गुरुग्राममध्ये एसीपी पदावर कार्यरत आहेत.