मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना काही महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी उपचार घेऊन कोरोनावर यशस्वीरित्या मात देखील केली होती. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच नितीन गडकरी यांनी देखील रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी योगाचा आधार घेतला आहे. वैद्यकीय सल्ला घेऊनत्यांनी घरीच काही व्यायाम प्रकार करण्यास सुरुवात केली आहे (Post Covid 19 rehabilitation exercise by minister Nitin Gadkari).
इतकेच नव्हे, तर त्यांनी कोरोनावर मात करणाऱ्या सर्वांनाच वैद्यकीय सल्ला घेऊन व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. ‘व्यायाम आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. जागतिक महामारी ‘कोव्हिड19’ने आपल्याला पुनर्जागृत केले आहे. या विषाणूच्या विळख्यात अडकलेल्या लोकांना या पद्धतींचा विशेष फायदा झाला आहे. माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी काही नियमित व्यायाम आसन करत आहे’, असे म्हणत त्यांनी हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
व्यायाम का हमारे जीवन में कितना महत्व है, वैश्विक महामारी Covid-19 ने हमें पुनर्जागृत किया है। सदियों पुरानी इस पद्धति का उन लोंगो को खास लाभ हुआ है, जो इस वायरस के प्रभाव में फंस चुके हैं। अपने चिकित्सक की सलाह पर मैं व्यायाम के कुछ खास आसन का नियमित अभ्यास कर रहा हूं। pic.twitter.com/mJhzLOoPHE
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 11, 2021
‘या व्यायामाचा मला खूप फायदा झाला आहे. यामुळे मला रोज ताजेतवाने वाटते. म्हणूनच हा अनुभव मी तुम्हा सर्वांसह शेअर करत आहे. कारण ही आसने केल्याने तुम्हालाही बरे वाटेल. मात्र, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर हे व्यायाम करून पहा’, असा सल्ला देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकांना दिला आहे (Post Covid 19 rehabilitation exercise by minister Nitin Gadkari).
नितीन गडकरी यांनी या व्हिडीओमध्ये काही व्यायामप्रकार केले आहेत. यात श्वासाच्या नियंत्रणावर विशेष लक्ष देण्यात आले आहे.
यातील काही व्यायाम प्रकार तुम्ही घरच्या घरी देखील करून पाहू शकता. मात्र, कुठलाही व्यायाम करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हे योगा करावेत.
(Post Covid 19 rehabilitation exercise by minister Nitin Gadkari)