पाटणा : पाटणामध्ये कोरोनाचं (Corona Virus) एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे (Post COVID Impact). या रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह आली होती. मात्र, सिटी स्कॅन आणि ब्लड टेस्टमध्ये या रुग्णाचे फुफ्फुस आणि यकृतांना खूप नुकसान झाल्याचं समोर आलं, हे पाहून डॉक्टरही चकित झाले. डॉक्टरांनी या परिस्थितीला ‘पोस्ट कोव्हिड इम्पॅक्ट’ सांगून त्यावर उपचार सुरु केले आहेत (Post COVID Impact).
पटणाच्या राजेन्दरनगर परिसरातील एका 65 वर्षीय महिलेची गेल्या अनेक दिवसांपासून तब्येत खराब होती. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. एक दिवस त्यांना ताप आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यावरुन त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. मात्र, याचा अहवाल निगेटिव्ह आला.
आहवाल निगेटीव्ह आल्यानंतर महिलेला वाटलं की त्यांना कोरोना झालेला नाही. पण, त्यांना श्वास घेण्यात अडथळा येत होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांची ब्लड टेस्ट केली. यामध्ये त्यांचं एलडीएच आणि शरीरातील प्रोटीनमोठ्या प्रमाणात वाढलं होतं. याप्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पटणाच्या व्हायरोलॉजिस्ट डॉ. प्रभात रंजन यांनी रुग्णाला फुफ्फुसांच्या चाचणीचा सल्ला दिला. त्यानंतर या रुग्णाचं सीटी स्कॅन करण्यात आलं.
सीटी स्कॅनच्या अहवालात या रुग्णाचे फुफ्फुस 40 टक्के खराब झाल्याचं समोर आलं. हे पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. त्यानुसार, या महिलेला कोरोना होवून गेल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं (Post COVID Impact).
डॉ. प्रभात रंजन यांनी या आजाराला ‘पोस्ट कोव्हिड इम्पॅक्ट’ असं नाव दिलं. तसेच, त्यांनी या आजारांच्या लक्षणांवरही डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. ‘या रुग्णामध्ये कोरोनाचे कुठलेही लक्षण नव्हते. पण, फुफ्फुस आणि ब्लड टेस्टने एक वेगळीच कहाणी पुढे आणली. म्हणून रुग्णावर उपचार शक्य झाले आणि रुग्ण निरोगी होऊन घरी गेला’, असं डॉ. प्रभात रंजन यांनी सांगितलं. तसेच, पाटणा येथे गेल्या अनेक दिवसांपासून असे रुग्ण समोर येत आहेत ज्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह असूनही त्यांच्यात ‘पोस्ट कोव्हिड इम्पॅक्ट’ पाहायला मिळत आहे.
भारतात 69 टक्के लोक म्हणतात, लसीकरणाची गरज नाही!, जाणून घ्या काय आहे कारण?https://t.co/9BkmkYx9xN#corona #vaccinations #CoronavirusStrain
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 22, 2020
Post COVID Impact
संबंधित बातम्या :
भारताच्या चार राज्यात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’, जाणून घ्या नेमकं काय होणार…
New Corona Strain : ब्रिटनहून आलेले 20 जण कोरोना पॉझिटिव्ह, प्रवाशांवर सरकारची नजर
लस येण्यापूर्वीच चिनी हॅकर्सचा डोळा; बनावट लसीची भीती, मुंबई पोलीस सतर्क