मुंबई, जर तुमच्याकडे रेशन कार्ड आहे आणि तुम्ही प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) अंतर्गत मोफत रेशन घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची (Latest Information) आहे. वास्तविक, ही योजना एप्रिल 2020 मध्ये कोविड काळात सुरू करण्यात आली होती नंतर मार्च 2022 मध्ये ही योजना सहा महिन्यांसाठी सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेशी (Pradhanmantri Garib Kalyan Yojna) तब्बल 80 कोटी लोक थेट जोडले गेले आहेत. आकडेवारीनुसार या योजनेचे लाभार्थी मोठ्याप्रमाणात आहे. केंद्र सरकार पुन्हा एकदा मोफत रेशन वितरणाची ही सर्वात मोठी योजना सहा महिन्यांनी म्हणजेच मार्च 2023 पर्यंत वाढविण्याची शक्यता आहे. केंद्रीय अन्न विभागाच्या सचिवांनीही तसे संकेत दिले आहेत. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अद्याब करण्यात आलेली नाही.
अधिकाऱ्यांच्या मते, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) ही जगातील सर्वात मोठी अन्न योजना आहे. यासाठी सरकारकडे धान्याचा पुरेसा साठा आहे. यासाठी सरकारकडून स्टॉकच्या स्थितीचाही आढावा घेण्यात आला आहे. सरकारने आतापर्यंत 3.40 लाख कोटी रुपये या योजनेवर खर्च केले आहेत. सरकारने योजेच्या कालावधीत वाढ केल्यामुळे लाभार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत देशातील सर्व गरीब शिधापत्रिकाधारक कुटुंबांना प्रति व्यक्ती 5 किलो रेशन दिले जाते. सुरुवातीला या योजनेंतर्गत कुटुंबाला एक किलो हरभरा डाळ आणि आवश्यक मसाल्यांचे एक किट देण्यात आले. पूर्वी ही योजना फक्त शिधापत्रिकाधारकांसाठी होती. नंतर त्यात शिधापत्रिका नसलेल्या गरीब कुटुंबांना देखील जोडण्यात आले.