प्रवासी गुजराती पर्व : दहशतवादाविरोधात होणार सर्जिकल स्ट्राईक, अमित शाह यांनी नेमकं काय सांगितलं

| Updated on: Oct 16, 2022 | 5:29 PM

भाजप सरकारनं गुजरातच्या विकासासाठी काम केलं.

प्रवासी गुजराती पर्व : दहशतवादाविरोधात होणार सर्जिकल स्ट्राईक, अमित शाह यांनी नेमकं काय सांगितलं
अमित शाह यांनी सांगितलं कारण
Image Credit source: tv 9
Follow us on

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये शनिवारी तीन दिवसीय प्रवासी गुजराती पर्व- 2022 (Pravasi Gujarati Parv) ला सुरुवात झाली. या कार्यक्रमात संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. अमित शाह म्हणाले, काँग्रेसच्या कार्यकाळात दहशतवादी नियमित हल्ला करत होते. पण, आता भारतातील सीमांचं उल्लंघन शक्य नाही. कारण याचा सामना सर्जिकल स्ट्राईकनं केला गेला. देशातील नंबर एक न्यूज नेटवर्स टीव्ही 9 आणि एआयएएनएच्या वतीनं तीन दिवसीय प्रवासी गुजराती पर्व 2022 चं आयोजन करण्यात आलंय.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमित शाह म्हणाले, अनिवासी गुजरातींनी गुजरातमध्ये भाजपला जिंकविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जिथं गुजराती गेले तिथं त्यांनी देशाची प्रगती केली. देशातचं नव्हे तर विदेशातही गुजरातींचं मोठं योगदान आहे.

अमित शाह म्हणाले, 1990 मध्ये निवडणूक झाली तेव्हा गुजरातींना भाजपच्या विजयात मोठी भूमिका पार पाडली. भाजप सरकारनं गुजरातच्या विकासासाठी काम केलं. नरेंद्र मोदी यांनी गुजरातची ओळख जगात करून दिली.

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी नवी दिशा दाखविली. कायदा व्यवस्थेत सुधारणा करायची आहे.

2024 पूर्वी आपणं राम मंदिर पाहणार आहोत. भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था झाल्याबद्दल अमित शाह यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं.

अमित शाह म्हणाले, गुजराती होण्याचा मला गर्व आहे. गुजरातनं देशात बदलाची सुरुवात केली आहे. मोदींच्या नेतृत्वात देश, गुजरात पुढं जात आहे.

अमित शाह यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देशानं एफडीआय, निर्यात, स्टार्ट अप, गरिबांना प्रत्यक्ष लाभ आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या.

काँग्रेसची सरकारच्या काळात काही बंधनं होती. ती आता तुटून पडली आहेत. यावेळी शाह यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. गुजरात दशहतवादाप्रती झीरो टॉलरन्सचं मोठं उदाहरण आहे, असंही ते म्हणाले.