नवी दिल्ली: राष्ट्रपती पदाच्या निवडणूक (Presidential Election) जाहीर होताच, देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. भाजप आणि त्यांच्या विरोधी पक्षातील नेत्यांची आज दिल्लीत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात महत्वपूर्ण बैठक (Election Meeting) झाली आहे. त्या बैठकीत सर्वसमावेशक चेहरा देण्याचा निर्णय झाला असला आहे. यावेली शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावासाठी काही 17 पक्षातील काही नेत्यांनी आग्रह धरला होता, मात्र त्या विनंतीला नम्रपणे नकार देत या राष्ट्रपती पदासाठी आपण इच्छूक नसल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.
राष्ट्रपती निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच अनेक चर्चेना उधान आले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी बुधवारी याच मुद्यावर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेऊन चर्चा केली.
ममता बॅनर्जी, शरद पवार, मल्लिकार्जून खरगे यांच्या उपस्थित झालेल्या या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीसाठीचा कोणताही उमेदवाराचे नाव या बैठकीमध्ये निश्चित झाले नाही. मात्र उमेदवाराबाबत सर्वसामान्यांचे मत तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार असेही यावेळी राजनाथ सिंह यांनी सांगितले.
प्रारंभीच्या चर्चेनंतर एनडीएची बैठक होणार असून त्यामध्ये उमेदवाराच्या नावावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होणार असल्याचेही सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीला जाण्यापूर्वी एनडीएच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
राजनाथ सिंह यांनी एनडीएचे घटक पक्ष जेडीयू नेते नितीश कुमार यांच्याशीही चर्चा केली आहे. दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जाच्या पहिल्या दिवशी आज 11 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी एक उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला आहे. अध्यक्षपदाची निवडणूक 18 जुलै रोजी होणार असून 21 जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 जून आहे.
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनीही आज अनेक विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींसोबत विरोधी पक्षांच्या उमेदवारांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. यावेळी या बैठकीला काँग्रेस, डावे, शिवसेनेसह अनेक पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.