यस बँकचे (Yes Bank) सहसंस्थापक राणा कपूर (Rana Kapoor) यांनी ईडीकडे धक्कादायक खुलासा केला आहे. राणा कपूर यांनी ईडीला दिलेल्या जबाबात असे म्हटले आहे की, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्याकडे असलेली एमएफ हुसेन यांची पेंटिंग खरेदी करण्यासाठी आपल्यावर दबाव निर्माण करण्यात आला होता. मी प्रियंका गांधी यांच्याकडून ती पेंटिंग दोन कोटी रुपयांना खरेदी केली. पुढे त्याच रकमेमधून सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार करण्यात आल्याचा दावा राणा कपूर यांनी केला आहे. स्पेशल कोर्टात ईडीकडून चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. या चार्जशीटमध्ये ईडीने राणा कपूर यांनी केलेल्या दाव्याचा उल्लेख केला आहे. या चार्जशीटमध्ये असे म्हटले आहे की, तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी राणा कपूर यांना ती पेंटिंग खरेदी करण्यास सांगितले होते, मुरली देवरा यांनी त्यावेळी राणा यांना म्हटले होते की, जर तुम्ही प्रियंका गांधींकडून ती पेंटिंग खरेदी केली नाही, तर तुमचे गांधी कुटुंबीयांशी असलेले संबंध बिघडू शकतात. तसेच तुम्हाला जो पद्मभूषण पुरस्कार मिळणार आहे, त्यामध्ये देखील अडचणी येऊ शकतात.
राणा कपूर यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी करण्यात आली, या चौकशीदरम्यान त्यांनी ईडीकडे हा गौप्यस्फोट केला आहे. ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या चार्जशीटनुसार कपूर यांनी असा दावा केला आहे की, आपल्यावर एफएम हुसेन यांची पेंटिंग खरेदी करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. तसेच ही पेंटिंग खरेदी न केल्यास तुमचे गांधी परिवारासोबत संबंध बिघडू शकतात. सोबतच तुम्हाला जो पद्मभूषण पुरस्कार मिळणार आहे, त्यात देखील अडचणी निर्माण होऊ शकतात असे सांगण्यात आले होते. त्यामुळे आपण दोन कोटींचा धनादेश देऊन ती पेंटिंग खरेदी केल्याचा दावा राणा कपूर यांनी केला आहे. त्यानंतर काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांच्याकडून आपल्याला माहिती मिळाली की ती रक्कम सोनिया गांधी यांच्या उपचारासाठी वापरण्यात आली.
कपूर यांनी ईडीला असे देखील सांगितले की मी जेव्हा ती पेंटिंग खरेदी केली तेव्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी म्हटले होते की, तुम्ही ही पेंटिंग खरेदी करून अगदी योग्य निर्णय घेतला आहे. तुम्ही जी रक्कम दिली त्यांच्यामधून आता सोनिया गांधी यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे. तुम्हाला आता पद्मभूषण पुरस्कार मिळताना कोणतीही अडचण येणार नाही, तुमच्या नावाचा विचार पद्म पुरस्कारासाठी करण्यात येईल. या सर्व प्रकरणात त्कालीन पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनींच आपल्याला ही पेंटिंग खरेदी करण्यास सांगितल्याचा दावा कपूर यांनी केला आहे.
Today Petrol Diesel price : सलग 19 दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर, कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ
Reliance : रिलायन्स-फ्यूचर डील रद्द, 24 हजार कोटींचा व्यवहार बासनात; बँकाचा विरोध