दोन पक्षांमध्ये अडकली केरळची जनता, एकासाठी कुटुंब आणि दुसऱ्यासाठी विचारधारा सर्वोच्च, पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल

| Updated on: Apr 24, 2023 | 9:08 PM

देशात आज लोकं स्टार्ट अप आणि डिजीटल इंडियाच्या चर्चा करत आहेत. देशातील जनता आणि युवक यांच्यावर जबाबदारी असल्याचंही त्यांनी म्हंटलं.

दोन पक्षांमध्ये अडकली केरळची जनता, एकासाठी कुटुंब आणि दुसऱ्यासाठी विचारधारा सर्वोच्च, पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल
Follow us on

कोची : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज केरळमधील कोची (Kochi in Kerala) येथे पोहचले. कोचीत मोदी यांनी सुरुवातीला रोड शो करून लोकांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी युवाम कॉन्क्लेव्हला (Yuvam Conclave) संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जोपर्यंत युवकांचा सहभाग एखाद्या मिशनमध्ये नसतो तोपर्यंत ते मिशन व्हाटब्रंट होत नसते. एखादे मिशन व्हायब्रंट होण्यासाठी युवकांची ऊर्जा गरजेची असते.

सीपीआयएम आणि काँग्रेसवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील सीपीआयएम आणि काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले, या दोन्ही पक्षांच्या विचारधारेमुळे केरळमधील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सीपीआयएमसाठी सर्वात मोठी त्यांची विचारधारा आहे. तर काँग्रेससाठी एक कुटुंब सर्वोच्च आहे.

हे सुद्धा वाचा

युवक स्वीकारताहेत जबाबदारी

पंतप्रधान मोदी म्हणाले, सीपीआयएम आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष हिंसा आणि भ्रष्टाचाराला चालना देतात. मोदी यांनी युवकांना आवाहन केले की, या दोन्ही पक्षांना हरवण्यासाठी परिश्रम करण्याची गरज आहे. केरळमधील भव्यता आणि सुंदरता मला ऊर्जा प्रदान करते, असंही त्यांनी म्हंटलं. केरळमधील युवक जबाबदारी स्वीकारण्यासाठी पुढे आल्याबद्दल त्यांचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले.

चर्चा स्टार्ट अप, डिजीटल इंडियाची

पंतप्रधान मोदी म्हणाले, एकवीसावे शतक हे भारताचे शतक आहे. आधीच्या काळात असे समजले जात होती की, भारतात काही बदल होणार नाही. परंतु, आता बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. देशात आज लोकं स्टार्ट अप आणि डिजीटल इंडियाच्या चर्चा करत आहेत. देशातील जनता आणि युवक यांच्यावर जबाबदारी असल्याचंही त्यांनी म्हंटलं.

केरळमधील ९९ वर्षांचे युवक

पतंप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात केरळमधील पद्म अवॉर्ड मिळवणारे वी. पी. अप्पुकुट्टा पोड्डवाल यांचा उल्लेख केला. काही दिवसांपूर्वी ते ९९ वर्षांच्या युवकासोबत भेटले होते. पोड्डवाल यांना पद्म अवॉर्ड देऊन भाजप सरकारने सन्मानित केले होते, याची आठवण त्यांनी करून दिली.