पंतप्रधान नरेंद्र मोदी अहंकार मुक्त पंतप्रधान; राजनाथ सिंह यांच्याकडून गौरव

| Updated on: Feb 27, 2024 | 11:36 AM

What India Thinks Today | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहंकार मुक्त पंतप्रधान असल्याचे कौतुक देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. इतक्या मोठ्या पदावर असतानाही त्यांना गोरगरिबांविषयी, कामगारांविषयी कनवाळा असल्याचे ते म्हणाले. देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क TV9 च्या वार्षिक संमेलन व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या तिसऱ्या दिवशी 'सत्ता संमेलनात' त्यांनी विचारपुष्प गुंफले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अहंकार मुक्त पंतप्रधान; राजनाथ सिंह यांच्याकडून गौरव
Follow us on

नवी दिल्ली | 27 February 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साधे, सरळ आणि सौम्य आहेत. ते अंहकार मुक्त पंतप्रधान असल्याचे कौतुक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. TV9 च्या वार्षिक संमेलन व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या तिसऱ्या दिवशी ‘सत्ता संमेलनात’ त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. जगातील घडामोडींच्या युद्ध धोरणांचा धाडोंळा घेतला. जागतिक पटलावर भारत कोणत्या ठिकाणी आहे. भारताचे स्थान काय यावर त्यांनी मत मांडले. अचूक निरीक्षण आणि कठोर भूमिकेसाठी ते ओळखल्या जातात. सरंक्षण मंत्र्यांनी भारत हा शांतीदूत असल्याचे स्पष्ट केले.

मोदी साधे, सरळ आणि सौम्य

माझ्यापेक्षा मोदी साधे सरळ आणि सौम्य आहे. समाजाच्या अंतिम शिडीवर मोदी बसलेले आहेत. तरीही झाडू मारणाऱ्यासोबत ते विनम्र आहेत. गरीब कुटुंबाशी संवाद साधताना ते सहज आणि सरळ असतात. ते अहंकार मुक्त पंतप्रधान आहे. मी साधा, सरळ आणि सौम्य असल्याची माहिती मला पहिल्यांदाच मिळाली. माझ्या मनात लवकर अहंकार निर्माण होत नाही. ही देवाची कृपा आहे. अहंकार निर्माण झाल्यास माणसाची व्हॅल्यू कमी होते. एखाद्या नंबरच्या पुढे पॉइंट टाकला तर त्याची व्हॅल्यू कमी होते. अहंकार असलेला व्यक्ती त्याच्यासाठी मोठा असेल पण जनतेसाठी अत्यंत कमी असतो. मी साधा सरळ आहे की नाही याची मी गॅरंटी देत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

हे सुद्धा वाचा

भारताची भूमिका निर्णायक

देशाची सुरक्षा हे आव्हान मोठं दिसत नाही. जग सध्या संकटातून जात आहे. दोन युद्ध सुरू आहेत. हे युद्ध शांत करण्यासाठी प्रभावी भूमिका केवळ भारतच निभावू शकतो. मोदींची मान्यता जवळपास जगातील सर्व राजकीय नेत्यांमध्ये आहे. रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं होतं. तेव्हा भारतातील विद्यार्थी तिकडे होते. जगातील कोणत्याही राष्ट्राध्यक्षांनी जे केलं नहाी ते मोदींनी केलं. त्यांनी रशिया आणि युक्रेनच्या राष्ट्रपतींशी चर्चा केली. अमेरिकेशी संवाद साधला. साडेचार पाच तासासाठी रशिया आणि युक्रेन युद्ध थांबलं आणि भारताचे विद्यार्थी भारतात आले. हे काम तोच नेता करू शकतो ज्याच्या प्रती विश्वास आणि भरोस असेल. जगात शांतता निर्माण करण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा भारतच मोठी भूमिका निभावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.