नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली परंपरा कायम ठेवत राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला चादर पाठवली आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे पंतप्रधान मोदींनी ही चादर सुपूर्द केली आहे. पंतप्रधान मोदींनी ही चादर ख्वाजा मोईनोद्दीन चिश्तीच्या 809व्या उरुसाला होणाऱ्या कार्यक्रमासाठी पाठवली आहे. अजमेर शरीफ दर्ग्याप्रती मोदींची पूर्वीपासून श्रद्धा आहे. यापूर्वीही मोदींनी 6 वेळा अजमेर शरीफ दर्ग्यासाठी चादर पाठवली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच त्यांनी चादर पाठवली होती. तेव्हाही मोदींनी ही चादर नक्वींकडे सोपवली होती आणि त्यांनी ती 25 फेब्रुवारी 2020 रोजी अजमेर शरीफ दर्ग्यावर चढवली होती.(PM Narendra Modi presents Chadar to Ajmer Sharif Dargah)
अजमेर शरीफ दर्ग्याला चादर पाठवण्याची पंतप्रधान मोदी यांची ही सातवी वेळ आहे. मोदींनी स्वत: त्याबाबत माहिती दिली आहे. ‘ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तीच्या 809व्या उरुसासाठी अजमेर शरीफ दर्ग्याला एक चादर भेट केली आहे’, असं ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केलंय.
Handed over a Chadar that would be offered at the Ajmer Sharif Dargah on the 809th Urs of Khwaja Moinuddin Chisti. pic.twitter.com/DHa1f5p0kk
— Narendra Modi (@narendramodi) February 15, 2021
कोरोना काळात राजस्थानातील अजमेर शरीफ दर्ग्यासहीत अनेक प्रमुख धार्मिक स्थळं बंद करण्यात आली होती. मात्र, सप्टेंबर 2020 मध्ये अनलॉक केल्यानंतर ही धार्मिक स्थळं उघडण्यात आली. अजमेर शरीफ दर्ग्यासह अनेक धार्मिक स्थळांवर सरकारने घालून दिलेल्या नियमांचं पालन केलं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 डिसेंबर रोजी सकाळी अचानक दिल्लीमधील गुरुद्वाराला भेट दिली. पंतप्रधान मोदी यांनी सकाळी गुरुद्वारा रकाबगंज इथं जात माथा टेकला आणि गुरु तेग बहाद्दुर यांना श्रद्धांजली अर्पण केली. मोदी यांचा गुरुद्वाराचा दौरा अचानक ठरला. त्यावेळी रस्त्यावरील ट्राफिकही अडवण्यात आली नव्हती. महत्वाची बाब म्हणजे मोदी यांच्यासाठी रोजप्रमाणेच सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. यावेळी कोणता खास पोलिस बंदोबस्तही करण्यात आला नव्हता. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करुन गुरु तेग बहाद्दुर यांना श्रद्धांजली अर्पण केल्याची माहिती दिली.
संबंधित बातम्या :
‘अवसर तेरे लिए खडा है, फिर भी तू चूपचाप पडा है’; मैथिली शरण गुप्त यांच्या कवितेतून मोदींचा संवाद!
PM Narendra Modi presents Chadar to Ajmer Sharif Dargah