नवी दिल्ली | TV9 नेटवर्कच्या ग्लोबल समिट ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ च्या दुसऱ्या पर्वामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. मोदी यांनी यावेळी केलेल्या भाषणामध्ये भाजप सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये केलेली कामे सांगत असताना विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसवर जोरदार टीका केली. भारत देश जगातील इतर देशांच्या तुलनेमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये वेगाने प्रगती करत असल्याचं मोदी म्हणाले. इतकंच नाहीतर देशातील लोकंही आता सरकारवर विश्वास ठेवत असल्याचं सांगताना मोदी यांनी म्युच्युअल फंडमध्ये लोकांनी केलेल्या गुंतवणूकीचा आकडा जाहीरपणे सांगितला.
जेव्हा अनेकांचं प्रिडिक्शन चुकतं त्यापेक्षाव अधिक आम्ही काम करून दाखवलं आहे. माइंडसेट आणि ट्रस्टमधील परिवर्तनाचं कारण म्हणजे आमच्या सरकारचं वर्क कल्चर आहे. तेच अधिकारी आहे, तेच ऑफिस आहे, त्याच फायली आहे, तीच व्यवस्था आहे. पण रिजल्ट वेगळा येत आहे. सरकारचे कार्यालय देशवासियांचे सहयोगी बनत आहे. पूर्वी भारत रिव्हर्स गिअरमध्ये होता. भारताच्या विकासाला गती देण्यासाठी मोठी झेप घेण्यासाठी, ज्या गिअरवर भारत चालत होता, तो गिअर बदलली पाहिज असं आम्ही ठरवल्याचं मोदी यांना सांगितलं.
2014 मध्ये देशात लोकांनी 9 लाख कोटी रुपये म्युच्युअल फंडमध्ये ठेवले होते. आज 2204 मध्ये 52 लाख कोटींहून अधिक रुपये म्युच्युअल फंडात गुंतवले आहेत. देश मजबुतीने पुढे जात आहे हा विश्वास असल्याने गुंतवणूक वाढली आहे. माझ्यासाठी काहीच अशक्य नाही असं सर्वांना वाटत आहे. मी काहीही करू शकत आहे, असंही त्यांना वाटत असल्याचं मोदी म्हणाले.
दरम्यान, मी आमच्या सरकारची काही उदाहरणे देतो. मुंबईचा अटल सेतू देशातील सर्वात मोठा सी ब्रीज. त्याचा शिलान्यास 2016 मध्ये झाला. त्याचं उद्घाटन केलं. संसदेची नवी इमारत तयार केली. जम्मू एम्स तयार केलं. राजकोट एम ही पूर्ण केलं. त्रिची एअरपोर्टचंही लोकार्पण झालं. आयआयटी भिलाईचा शिलान्यास झाला आणि लोकार्पण केलं. गोव्याच्या नव्या विमानतळाचं लोकार्पण केलं. लक्षद्वीपमध्ये ऑप्टिकल फायबर बसवले, हे काम कठीण होतं. काही आठवड्यापूर्वीच आम्ही पूर्ण केल्याचं मोदींनी सांगितलं.