नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना यांनी कोरोना लस टोचून घेतल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला. मी एम्समध्ये जाऊन कोव्हिड लसीचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्या देशाचे वैज्ञानिक आणि डॉक्टर्स ज्या वेगाने काम करत आहेत, ते प्रशंसनीय आहे. कोरोना लस घेण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींना मी लसीकरणासाठी येण्याचे आवाहन करतो. आपण सर्वांनी एकत्र मिळून देशाला कोरोनामुक्त करुयात, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले. (PM Narendra Modi took Bharat Biotech Covaxine dose at AIIMS Delhi)
Prime Minister Narendra Modi took his first dose of #COVID19 vaccine at AIIMS Delhi pic.twitter.com/ftsr3AANCs
— ANI (@ANI) March 1, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन ही लस टोचून घेतली. अंतिम टप्प्याच्या चाचण्या होण्यापूर्वीच या लसीला मान्यता मिळाल्याने कोव्हॅक्सीनच्या सुरक्षिततेतविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोव्हॅक्सीन ही देशी लस घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता.
मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: कोव्हॅक्सीन टोचून घेतल्याने या लसीविषयीची शंका दूर होण्याची शक्यता आहे. परिणामी लसीकरण मोहिमेचा वेगही वाढण्याचा अंदाज आहे.
1 मार्चपासून देशातील ज्येष्ठ व्यक्ती आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांना कोरोनाची लस देण्याचे सरकारने जाहीर केले होते. याशिवाय, खासगी रुग्णालयातही 250 रुपयांत कोरोना लस देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने नुकतीच यासाठी परवानगी दिली.
कोरोनाची लस टोचून घेणं बंधनकारक नाही. ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार कोरोनाची लस घेऊ शकता. कोणावरही लसीसाठी जबरदस्ती नाही. लस घेणं किंवा न घेणं ऐच्छिक असेल.
सध्या सामान्य नागरिकांसाठी लस उपलब्ध नाही. कोव्हिड योद्धे, हायरिस्क कॉन्टॅक्टमधील कर्मचारी, आणि आता ज्येष्ठ नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोव्हिड 19 व्हॅक्सिनसाठी Co-WIN App तयार केलं आहे. हे अॅप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड केल्यानंतर त्यावर रजिस्ट्रेशन करावं लागेल. सध्या तरी सर्वांना या अॅपचा अॅक्सेस नाही.
एक मार्चपासून 60 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस, जावडेकरांची घोषणा
Covishield vaccine A to Z | कोव्हिशिल्ड लसीचे किती डोस तयार, तुम्हाला कशी आणि किती रुपयात मिळणार?
तुम्हाला कोरोना लस आता मिळू शकते का? लस मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया
(PM Narendra Modi took Bharat Biotech Covaxine dose at AIIMS Delhi)