चंदिगढ, कारागृहातले जीवन म्हणजे फक्त एकाकीपणा! ना कुटुंब ना कोणी परिचयाचे. मात्र कैद्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. तुरुंगातल्या कैद्याला (prisoner) आपल्या जोडीदारासोबत (Partner) एकांतात एकत्र वेळ घालवता येणार आहे (Meeting in Private room). या सुविधेची सर्वत्र चर्चा होत आहे. तुरुंगात कैद्यांसाठी खास खोली बनवण्यात आली आहे. या खोलीत भेटीदरम्यान कैदी शारीरिक संबंधही (physical relation) बनवू शकतो. ऐकायला हे आश्चर्यकारक वाटत असले तरी हे खरं आहे. पंजाबमधील तुरुंगात बंद कैद्यांना आता अशी सुविधा मिळणार आहे. आता पती-पत्नी पंजाबच्या (Panjab) तुरुंगात एकांतात वेळ घालवू शकणार आहेत. अशी सुविधा देणारे पंजाब हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, सिंग गोइंदवाल तुरुंगातील कैदी गुरजित हे या सुविधेचा लाभ घेणारे पहिले कैदी आहेत. त्यांनी सांगितले की, तुरुंगातील कैद्याला एकटेपणा जाणवतो त्यामुळे ते नैराश्यात राहतात, मात्र या सुविधे अंतर्गत जेव्हा माझी पत्नी मला भेटायला आली तेव्हा आम्ही एका खोलीत काही तास एकांतात घालवले. माझ्यासाठी हा मोठा दिलासा होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
गुरजीत सिंग हे हत्येप्रकरणी शिक्षा भोगत आहे. या नव्या सुविधेबद्दल ते पंजाब सरकारचे आभार मानत आहेत. पती-पत्नीला जेलमध्ये एकांतात भेटण्याची सुविधा देणारे पंजाब आता पहिले राज्य बनले आहे. पंजाबच्या या तुरुंगात मिळणाऱ्या सुविधांबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या भेटीदरम्यान पती-पत्नीमध्ये शारीरिक संबंधही ठेऊ शकतात.
यापूर्वी पंजाबमध्ये कैद्यांना त्यांना भेटायला आलेय जोडीदाराशी शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी नव्हती. भेटायला आलेले कुणीही ठराविक अंतरावर उभे राहून बोलू शकत होते. यादरम्यान त्यांच्यामध्ये काचेची भिंतही होती. गुरजीत सिंह म्हणाले की, आता सरकार विवाहित जोडप्यांना तुरुंगात खाजगी भेटीगाठी घेण्याची परवानगी देत आहेत. हा अत्यंत सुखद निर्णय आहे.
या नव्या सुविधेबाबत पंजाबचे विशेष महासंचालक हरप्रीत सिद्धू यांनी बीबीसीला सांगितले की, जो जोडीदार तुरुंगाच्या बाहेर आहे त्याच्यासाठी त्याच्या जोडीदाराचा सहवास न मिळणं ही देखील एक प्रकारची शिक्षाच आहे.
या कैद्यांचे समाजात परत येणे सुनिश्चित व्हावे, एवढीच आमची इच्छा आहे. त्यामुळेच पंजाबच्या तुरुंगात एकांतात भेटण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” ते म्हणाले की, देशातील हा अशा प्रकारचा पहिला पायलट प्रकल्प असून सध्या 25 पैकी 17 ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे.
हरप्रीत सिद्धू म्हणाले की अशी सुविधा अनेक देशांच्या तुरुंगांमध्ये आहे. याशिवाय न्यायालयांचे असे अनेक आदेश आहेत जे या सुविधेला समर्थन देतात. जोडप्यांचे मिलन किंवा त्यांच्यातील लैंगिक संबंध ही एक गरज आहे असेही ते म्हणाले.
या सुविधेचा लाभ घेणाऱ्या अर्जांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, पहिल्याच आठवड्यातच कैद्यांकडून त्यांच्या जोडीदाराला भेटण्याच्या परवानगीसाठी 385 अर्ज प्राप्त झाले आहे.
पंजाब सरकारने आपल्या निर्णयामध्ये वैवाहिक जीवनाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी शब्दकोशाचा हवाला दिला आहे आणि म्हटले आहे की विवाहित जोडपे तुरुंगात त्यांच्या भेटीदरम्यान लैंगिक संबंध ठेवू शकतात. पंजाब सरकारच्या म्हणण्यानुसार अनेक देशांमध्ये अशा भेटीला परवानगी आहे. यामध्ये अमेरिका, फिलिपिन्स, कॅनडा, सौदी अरेबिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, फ्रान्ससह अनेक देशांचा समावेश आहे.
या सुविधेचा फायदा गुंडांना मिळणार का?, असा प्रश्न नक्कीच तुमच्याही मनात आला असेल. मात्र गुंड किंवा अधिक धोकादायक कैद्यांना त्यांच्या पती किंवा पतींना भेटण्याची परवानगी नाही. नमूद केलेल्या नियमांनुसार, उच्च जोखमीचे कैदी, गुंड आणि दहशतवादी यांना ही सुविधा मिळणार नाही.
यासोबतच लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्यांना ही सुविधा मिळणार नाही. तसेच ज्या कैद्यांना टीबी, एचआयव्ही, लैंगिक आजार आहेत त्यांनाही ही परवानगी मिळणार नाही. अशा परिस्थितीत कारागृहातील डॉक्टरांकडून मंजुरी घ्यावी लागेल.