लखनऊ / 7 ऑगस्ट 2023 : आझमगढमधील विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक आणि शिक्षकाच्या अटकेच्या निषेधार्थ 8 ऑगस्ट रोजी खाजगी शाळा बंदची हाक देण्यात आली आहे. कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी मुख्याध्यापक आणि शिक्षकाच्या अटकेविरोधात अनाएडेड प्रायव्हेट स्कूल असोसिएशनने बंदची हाक दिली आहे. 8 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यातील खासगी शाळा बंद ठेवण्याचे आवाहन असोसिएशनने केले आहे. 31 जुलै रोजी अकरावीच्या विद्यार्थिनीचा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुख्याध्यापक आणि शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. विद्यार्थिनी मृत्यू प्रकरण आता चांगलेच तापले आहे. उद्या खाजगी शाळा बंदला किती प्रतिसाध देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विद्यार्थिनीचा मृत्यू ही दुःखद बाब आहे. असे घडायला नको होते. मात्र मुख्याध्यापक आणि शिक्षकाची अटक चुकीची असल्याचे म्हणत चौकशीची मागणी केली आहे. चौकशीत जर ते दोषी आढळले तर त्यांना जरुर शिक्षा व्हावी, असे संघटनेचे म्हणणे आहे. यामुळे या अटकेच्या निषेधार्थ सर्व खाजगी शाळा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पालकांनीही मुलांना 9 ऑगस्ट रोजी शाळेत पाठवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
आझमगढमधील महिला महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थिनीने इमारतीवरुन उडी जीवन संपवले होते. मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोपी नातेवाईकांनी केला होता. याप्रकरणी शिक्षक आणि मुख्याध्यापकांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली. मात्र याप्रकरणी आधी चौकशी व्हावी. मग दोषींवर कारवाई व्हावी, असे संघटनेचे म्हणणे आहे. तर 9 ऑगस्ट रोजी सर्व खाजगी शाळांचे शिक्षक आणि इतर कर्मचारी काळ्या फिती बांधून निदर्शन करतील.