प्रयागराज : काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा गुरुवारी प्रयागराजमध्ये पोहोचल्या. एकदिवसीय यात्रेवर आलेल्या प्रियंका गांधी दुपारी अरेल घाटवरील संगमात स्नान करण्यास पोहोचल्या. इतकच नाही तर परतताना त्यांनी स्वत: नाव चालवली. त्यांनी आपली मुलगी आणि अन्य लोकांसोबत गंगा नदीची सैरही केली. यावेळी प्रियंका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी आणि त्यांची मुलगी आराधना मिश्राही उपस्थित होत्या. प्रियंका गांधी जेव्हा नावेवर सवार होत संगमावर जात होत्या तेव्हा माघ यात्रेतील भाविकांवर योगी सरकारनं हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव केला.(Priyanka Gandhi’s Ganga bath in Prayagraj)
उत्तर प्रदेशात मौनी आमावस्येनिमित्त हजारो भाविक गंगास्नानासाठी पोहोचले आहेत. गुरुवारी पहाटेपासूनच पवित्र नद्यांच्या संगमावर भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यावेळी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी सकाळी 11.40 वाजता आनंद भवन इथं पोहोचल्या. तिथे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी प्रियंका गांधी यांचं जोरदार स्वागत केलं.
गेटवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे आनंद भवनचं गेट उघडण्यात आलं. यावेळी अनेक कार्यकर्ते आत घुसले, त्यानंतर त्यांना अडवण्यात आलं. आनंद भवन इथं पोहोचल्यावर प्रियंका यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या समाधीवर अभिवादन केलं. त्यानंतर त्या अनाथ मुलींशी भेटल्या आणि त्यांच्याशी चर्चाही केली.
प्रियंका गांधी यांना मोठ्या गर्दीतून सीमा सिंह या विद्यार्थिनीने आवाज दिला. तेव्हा प्रियंका गांधी यांनी सुरक्षेचं कडं तोडून सीमा सिंहला भेटल्या आणि तिच्याशी गप्पा मारत आपल्या गाडीपर्यंच आल्या.
प्रियंका गांधी यांनी शंकराचार्य स्वामी स्वरुपानंतर सरस्वती यांचीही भेट घेतली. शंकाराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी प्रियंका यांच्या भेटीनंतर म्हटलं की, प्रियंका यांनी संगमावर डुबकी मारुन बाजी मारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मात्र आले नाहीत.
संबंधित बातम्या :
Priyanka Gandhi’s Ganga bath in Prayagraj