Khanna Vehicle Collision : दिवाळीमुळे सध्या सगळीकडे उत्साहाचं, आनंदाचं वातावरण आहे. मात्र याच सणादरम्यान पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंजाबच्या लुधियानामध्ये 100 वाहनं एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात झाला. दाट धुक्यामुळे पुढचं काहीच दिसत नसल्याने ही वाहने एकमेकांवर आपटली आणि हा अपघात झाला.
पंजाबच्या खन्ना येथे हा अपघात झाला असून त्यामध्ये सुमारे 12 प्रवासी जखमी झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला. अमृतसर- दिल्ली या राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
100 वाहनं एकमेकांवर आदळली आणि…
अमृतसर- दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर 100 हून अधिक वाहनं एकमेकांवर आदळल्याने अनेक जण जखमी झाले. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. अपघातातील जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. यामध्ये एका व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाला. दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील खन्नाजवळ पहाटे सुमारे 100 वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात घडला. या अपघातामध्ये पंजाब रोडवेजच्या एक बसचेही मोठे नुकसान झाले.
VIDEO | Casualties feared after several vehicles collided with each other due to fog in Khanna, Ludhiana. More details are awaited. pic.twitter.com/Wwdvnyurlq
— Press Trust of India (@PTI_News) November 13, 2023
अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी
मोठ्या संख्येने वाहनं एकमेकांवर आदळल्याने त्या रस्त्यावर काही काळासाठी ट्राफिक जामही झाला होता. प्रशासन आणि पोलिसांद्वारे दुर्घटनाग्रस्त वाहने एका बाजूला हटवण्यात आल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. या अपघातात एकाच मृत्यू झाला आणि वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली.
दृष्यमानता कमी झाल्याने अपघात
रिपोर्टनुसार, पहाटेच्या सुमारास सुमारे 20-25 किलोमीटर अंतरापर्यंत वाहने एकमेकांवर आदळली. धुक्यामुळे रस्त्यावर समोरचं काहीच दिसत नसल्याने मागून येणाऱ्या गाड्या धडाधड एकमेकांवर आदळल्या. फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ झाल्याने आणि धुके यामुळे दृष्यमानता कमी झाल्याने हा अपघात झाल्याचं माहिती समोर आली आहे.