तिच्या सोबतचा एक फोटो आणि प्रेमामुळे तपास यंत्रणांच्या जाळ्यात अडकला पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड

| Updated on: Feb 14, 2023 | 4:20 PM

पाकच्या जैश-ए-महंमदने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती. परंतू हा हल्ला पाकच्या अतिरेक्यांनी घडविला होता असा भारतीय तपास यंत्रणांना संशय होता. परंतू कश्मिरी तरुणांच्या नावावर तो खपवण्याचा पाकचा प्रयत्न होता.

तिच्या सोबतचा एक फोटो आणि प्रेमामुळे तपास यंत्रणांच्या जाळ्यात अडकला पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड
Pulwama-story
Image Credit source: socialmedia
Follow us on

श्रीनगर : चार वर्षांपूर्वी  14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील जम्मू – श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाजवळ सीआरपीएफच्या वाहनांच्या ताफ्यावर दुपारी सुमारे 3 .15 वाजता स्फोटकांनी भरलेल्या निळ्या रंगाच्या मारूती कार धडक देऊन महाभयंकर आत्मघाती हल्ला घडविल्याने देशाला हादरवून टाकले होते. या हल्ल्यात चाळीस जवान ठार झाले होते. या प्रकरणात पाकिस्तानी नागरीकाचा हात असल्याचा संशय पूर्वीपासूनच भारतीय तपास यंत्रणांना होता. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोलीस एका मोबाईलमध्ये सापडल्या एका तरूणीच्या फोटोमुळे कसे पोहचले ते वाचा…

हा आत्मघाती हल्ला कश्मिरी तरूणानेच स्वत: च्या बळावर केला असे पाकिस्तानला भासवायचे होते. त्यातून त्यांना कश्मिरी तरूण भारतापासून कसे नाराज आहेत असे भासवायचे होते. परंतू हा आत्मघाती हल्ला अत्यंत नियोजितपणे स्फोटकांनी भरलेल्या निळ्या रंगाच्या मारूती कारद्वारे घडविला होता. या हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी एनआयएचे जम्मू कश्मीर ब्रांचचे प्रमुख राकेश बलवाल यांच्यावर सोपविली होती. राकेश बलवाल यांना घटनास्थळी निळ्या रंगाच्या गाडीच्या चेसिस आणि इंजिनाचे तुकडे सापडले होते. परंतू अतिरेक्यांनी चेसिस नंबर हटवले होते.

शेवटी मारूती कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी ही मारूती इको कार 25  जानेवारी 2011  ला फॅक्टरीतून बाहेर आल्याचे सांगितले. त्या दिवशी सात कार फॅक्टरीतून निघाल्या होत्या. त्यातील एक कश्मीरला आली होती. परंतू तिचे सहा मालक बदलेले होते. त्यामुळे शेवटचा मालक सज्जाद भट्ट् याचे नाव अखेर पुढे आले आणि तो अनेक दिवस घरी आलेला नव्हता. दुसरीकडे पाकच्या जैश-ए-महंमदने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती. परंतू हा हल्ला पाकच्या तरुणाद्वारे घडविण्याता आला होता असा भारतीय तपास यंत्रणांना संशय होता. परंतू कश्मिरी तरुणाच्या नावावर खपवण्याचा पाकचा प्रयत्न होता.

अखेर पुलवामाच्या हल्ल्या दिवशी ती निळी कार आदिल अहमद डार चालवते होता हे स्पष्ट झाले. अखेर पुलवामाच्या आसपास शोध सुरू झाला. घटनास्थळी पाहणी केली असता जमिनीवर त्या कारची चावी सापडली आणि अहमदची हाडे सापडली. 17 जून 2019 ला या कारला खरेदी करणारा सज्जाद भट्ट अखेर सापडला. परंतू तो अनंतनाग मध्ये एका अतिरेक्याच्या घरात लपलेला असताना चमकीत ठार झाला. त्यामुळे या प्रकरणात पाकचा आहे हे स्पष्ट करणारा एकही पुरावा सापडत नव्हता. पुलवामा हल्ल्याला सहा महिने उलटले होते. अखेर एनआयएने चकमकीत ठार झालेल्या अतिरेक्यांचा तपास सुरु केला.

अखेर 29 मार्च 2019  मध्ये एका चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले होते. त्याचा तपास केला गेला. एकाचे नाव कामरान तर दुसऱ्याचे ईदरीश भाई. यांचे मोबाइल तपासले असता इदरीशचा मोबाईल सुरु होत, नव्हता मग त्याला लॅबोरेटरीत पाठवले. शेवटी अखेर त्याच मोबाईलमध्ये सापडलेल्या एका फोटोत घराजवळ तिच निळी कार उभी असलेली दिसत होती. ज्या घराजवळ ती उभी होती. ते शाकीर बशीरचे होते. हाच तो बशीर होता. ज्याला हल्लेखोर आदीर डार शेवटचा भेटला होता. त्यात तिघांचे फोटो होते. शाकीर बशीर, चकमकीत ठार झालेला इदरीश भाई आणि हल्लेखोर आदिल अहमद डार.

शाकीर बशीरला अटक झाली. परंतू तो खूपच धार्मिक होता. त्याने इदरीश आणि आदिलने इस्लामसाठी हे काम केले असे सांगितले. आणि अन्य माहिती देण्यास नकार दिला. इदरीश याच्या मोबाईलमध्ये काही महिलांचेही फोटो होते. त्यात इंशा जान हीचाही फोटो होता. ती पुलवामाची राहणारी होती. शाकीर बशीरला पोलीसांनी मुद्दाम तिचा फोटो दाखविला. त्याने काम झाले. लग्न झालेल्या इदरीश भाई याचे अन्य महिलांशी संबध पाहून तो गोंधळला, आणि शाकीर पोलिसांशी बोलू लागला.तो राकेळ बलवाल यांना म्हणाला मला तुम्हाला काही सांगायचे आहे.

शाकीर बोलला, इदरीश भाई खरे तर उमर फारूक होता. आणि तो जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अजहर याचा सख्खा भाचा होता. तसेच 1999 मध्ये भारतीय विमान अपहरण प्रकरणातल्या एका आरोपीचा तो मुलगा होता. उमर याला अनेक वर्षे अफगाणिस्तानात प्रशिक्षण देण्यात आले होते.

शाकीर एनआयएला सांगितले की पुलवामा हल्ल्याची संपूर्ण कट उमर फारूक याने रचला होता. तो बॉम्ब बनविण्यात एक्सपर्ट होता. उमर याने आदिल अहमद डार याला जिहादच्या नावाने भडकवले होते आणि हल्ल्यासाठी तयार केले होते. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये बसलेल्या मसूद अजहरचा भाऊ रौफ असगर याने आपला भाचा उमर फारूक याला सांगितले होते की मोबाईल फोन नष्ट करून नदीत टाकून दे. परंतू उमर याने इंशा आणि अन्य मुलींच्या फोटोंसाठी हा फोन तोडला नाही, त्याने दुसरा फोन तोडून त्याचा फोटो पुरावा म्हणून असगर याला पाठवला होता. जर काकांचे ऐकून जर त्याने फोन तोडला असता तर तो एनआयएला सापडला नसता आणि पुलवामा हल्ल्याचे पाकिस्तानशी असलेले थेट कनेक्शन कधीच उघड झाले नसते !