पुरात एवढ्या मोठ्या शहरात महाकाय अजगर आला कसा ? पाहा

| Updated on: Jul 28, 2023 | 11:51 AM

नदीला पूर आल्याने ते पाणी घरात शिरले होते. त्या पाण्यासोबत एक अजगर वाहून आला, तो पाहून लोकांची घाबरगुंडी उडाली होती.

पुरात एवढ्या मोठ्या शहरात महाकाय अजगर आला कसा ? पाहा
Follow us on

हैदराबाद | 28 जुलै 2023 : मुसळधार पावसाने नदीला पूर आला अन् ते पाणी घरात (flood water) घुसल्याने नागरिक अडकले. त्यातच त्या पाण्यासोबत एक भलामोठा अजगर (python) वाहून आल्याचे दिसताच नागरिकांची घाबरगुंडी उडाली होती. तेलंगणातील खम्मम येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

या शहरातील एफसीआय गोदाम क्षेत्राजवळ सारथी नगर येथे मुनेरू नदीला पूर आल्याने त्याचे पाणी गावात शिरले. अनेक घरं पुराच्या पाण्यात बुडू लागली. त्यापैकीच एक घर पाण्यात पूर्ण बुडलेले असतानाच तेथे एक मोठा अजगर सापडल्याने नागरिक हादरले.

पुराच्या पाण्यात अजगर पोहताना आढळून आल्याचे काही नागरिकांनी पाहिले आणि त्यांनी याची सूचना रेस्क्यू टीमला दिली. बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी तेथे तत्काळ धाव घेतली आणि अथक प्रयत्नांनंतर अजगराला पकडण्यात त्यांना यश आले. टीममधील काही लोकांनी हातातच अजगर पकडला व ते रस्त्यावर खुलेआम फिरत होते. ते दृश्य पाहून लोकांमध्ये एकच खळबळ उडाली.

या घटनेमुळे शहरातील रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडीही झाली होती. अखेर बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी अजगराला जंगलात सुखरूपपणे सोडू दिले.