फरुखाबाद : प्रेयसी सोबत रुग्णालयात इलाजासाठी गेलेल्या पतीला पत्नीने रंगेहाथ पकडले. त्यानंतर प्रेयसी आणि पत्नीमध्ये जोरदार फ्री स्टाईल हाणामारी (Free Style Fighting) पहायला मिळाली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे. हाणामारीनंतर पतीने (Husband) पत्नी आणि प्रेमिका दोघींचीही चप्पलने धुलाई केली. यानंतर दोघीही आपापल्या वाटेने निघून गेल्या. उत्तर प्रदेशातील फरुखाबाद येथे ही घटना घडली आहे.
फरुखाबाद येथील राम मनोहर लोहिया रुग्णालयात 20 ऑक्टोबर रोजी पती आपल्या प्रेमिकेसह उपचारासाठी गेला होता. या घटनेची माहिती पत्नीला मिळाली आणि ती रुग्णालयात हजर झाली. आपल्या पतीला दुसऱ्या स्त्रीबरोबर पाहून पत्नीचा संताप अनावर झाला.
दोघींमध्ये जोरदार भांडण सुरु झाले. हळूहळू भांडणाचे रुपांतर मारहाणीत झाले. यानंतर पतीच्या प्रेयसीनेही महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघींमध्ये रुग्णालयाच्या बाहेरच दोघींमध्ये हाणामारी सुरू झाली.
दोघींची हाणामारी पाहून रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमा झाली. पतीनेही दोघींना समजावण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघीही ऐकत नव्हत्या.
अखेर संतापलेल्या पतीने चप्पल काढली आणि दोघींची धुलाई सुरु केली. यानंतर दोघीही वेगवेगळ्या झाल्या आणि प्रेयसी आपल्या मार्गाने निघून गेली. तर पती पत्नीसह निघून गेला.
मारहाणीची घटना बघ्यांपैकी कुणीतरी मोबाईलमध्ये कैद केली. 28 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल केला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.