वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील गडबडीमुळे देशात एकच गदारोळ उडाला आहे. विद्यार्थीक, पालक, विरोधक आणि न्यायपालिकेने पण संताप व्यक्त केला आहे. त्यातच आता एका आरोपी विद्यार्थिनीने याप्रकरणात एक मोठा खुलासा केला आहे. नीटचा पेपर तिला परीक्षेपूर्वी रात्रीच मिळाल्याचे आणि त्यातील 100 टक्के तेच प्रश्न असल्याचा कबुलीनामा तिने दिला आहे. तिच्या मामाने पेपर मिळविण्यासाठी ‘सेटिंग’ लावल्याची कबुली तिने दिली आहे. त्यासाठी आत्याच्या पतीने तिला कोटाहून पाटणा येथे बोलावून घेतले. रात्री तिच्याकडून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर घोकून घेण्यात आले. परीक्षेनंतर पोलिसांनी तिला अटक केली.
67 विद्यार्थी टॉपर
4 जून रोजी नीट परीक्षेचा निकाल आला तेव्हा पहिल्यांदा 67 विद्यार्थी टॉपर ठरले. त्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले. गुणवंत्तांच्या यादी पाहिल्यावर त्यात गडबड झाल्याचा आरोप झाला. 13 जून रोजी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने ग्रेस मार्क प्राप्त परीक्षांर्थींची परीक्षा पु्न्हा घेण्याचा निर्णय घेतला. पण विद्यार्थ्यांचा संताप थांबला नाही. बिहार आणि गुजरातमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याचे वृत्त समोर येताच एनटीए संशयाच्या भोवऱ्यात अडकली. याप्रकरणात आतापर्यंत बिहारमधून 13 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात 4 विद्यार्थिनी आहेत. पेपर फुटल्यानंतर आरोपींनी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही आरोपींनी विद्यार्थांना प्रश्नपत्रिकाच नाही तर त्याची उत्तरपत्रिका पण दिली.
अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती
पोलिसांनी या रॅकेटच्या मुळाशी जाण्याचा निश्चिय केलाा. त्यांना महत्वपूर्ण धागेदोरे हाती लागले आहेत. पोलिसांच्या तपासात कनिष्ठ अभियंता सिकंदर प्रसाद यादवेंद्रू पण हाती लागला. त्याची विचारपूस केली असता अनेक थक्क करणाऱ्या गोष्टी समोर आल्या. या पेपरफुटीत त्याचा सहभाग आढळून आला. भाच्यासाठी त्याने ही गडबड केली होती. पटणा येथील शास्त्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये त्याचा भाचा अनुराग यादव याची चौकशी करण्यात येत आहे.
विरोधकांनी केला प्रहार
देशातील महत्वाच्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड होत असल्याने देशभरातील पालक आणि विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. इतकेच नाही तर सुप्रीम कोर्टाने पण नाराजी व्यक्त केली आहे. आता विरोधकांनी पण सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेता प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले. परीक्षेवर अनेकदा चर्चा केली, आता NEET परीक्षेवर चर्चा कधी करणार? असा टोला त्यांनी हाणला. तेजस्वी यादव यांनी पण निशाणा साधला.