नवी दिल्लीः भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेत फिटनेसच्या प्रत्येक कसोटीवर पास होणारे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज संसदेच्या अर्थसंकल्पीय (Budget session) अधिवेशनात हजेरी लावली. भारत जोडो यात्रेच्या समाप्तीचा कार्यक्रम अजून बाकी आहे. मात्र जम्मू काश्मीरमध्ये यात्रेचा अखेरचा टप्पा होता. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधी यांनी उत्साहाने हजेरी लावली. दिल्ली आणि संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी आहे. थंड वाऱ्यांची लाट असतानाही राहुल गांधी यांनी सकाळी सकाळी हाफ शर्ट घालून पोहोचले आणि त्यानंतर काँग्रेस खासदारांनी एकच जल्लोष केला.
संसद भवनात राहुल गांधी यांनी प्रवेश केल्यावर हाफ शर्ट-पँट या वेशभूषेत अत्यंत आत्मविश्वासाने ते चालत आले. यावेळी काँग्रेस खासदारांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. भारत जोडो यात्रेतल्या घोषणा देण्यात आल्या. राहुल गांधी मंगळवारीच श्रीनगरहून परतले.
07 डिसेंबर रोजी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. ही यात्रा 12 राज्य, 2 केंद्रशासित प्रदेशांतून गेली. जम्मू काश्मीरमध्ये यात्रेचा समारोप झाला. जवळपास 150 दिवसांच्या या प्रवासात राहुल गांधी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी 3570 किमी प्रवास केला.
#BharatJodoYatra के बाद आज संसद में पहुँचे @RahulGandhi pic.twitter.com/UoZjJTjKx3
— Supriya Bhardwaj (@Supriya23bh) February 1, 2023
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी 12 जाहीर सभा घेतल्या. 100 पेक्षा जास्त बैठका, 13 पत्रकार परिषदांना संबोधित केलं. यात्रेत तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर राज्यांचा समावेश होता.
सोमवारी श्रीनगर येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे काँग्रेसच्या मुख्यालयात राष्ट्रीय ध्वज फडकवतील. याच वेळी भारत जोडो यात्रेच्या स्मारकाचं अनावरण करण्यात येईल. त्यानंतर ही यात्रा समाप्त झाल्याचं घोषित केलं जाईल.
राहुल गांधी यांच्या यात्रेचा दुसरा टप्पा लवकरच होणार असल्याचं म्हटलं जातंय. काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल यांनी सांगितलं की, दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो यात्रेचा रोडमॅप अद्याप तयार झाला नाही. मात्र तो अवश्य होणार आहे. पुढील दोन ते तीन महिन्यात भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरु होईल. यावेळी ही यात्रा पश्चिमेकडून पूर्वेतील राज्यांकडे जाईल, असं म्हटलं जातंय.
भारत जोडो यात्रा संपण्यापूर्वीच काँग्रेसने नवी मोहीम सुरु केली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम साजरे करताना काँग्रेसने हाथ से हाथ जोडो अभियानाला सुरुवात केली. हे अभियान दोन ते तीन महिने चालेल. या मोहिमेत नवा उपक्रम राबवला जातोय. भारत जोडो यात्रेदरम्यान आलेले अनुभव एका पत्राद्वारे शेअर करत काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेत आहेत.