उदयपूर : देशाच्या राजकारणात सक्रीय असणाऱ्या काँग्रेसला (Congress) आता उतरती कळा लागली आहे. मागे झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला. त्यामुळे पुढे जाण्यासाठी काँग्रेसमध्ये हे संगटनात्मक बदलांसह अनेक प्रयोग व्हायला हवेत अशी अनेक काँग्रेसी नेत्यांची मागणी होती. तसेच काँग्रेस अध्यक्षाबाबत (Congress President) निर्णय व्हायला हवा असेही वरिष्ठ नेते बोलत होते. त्याप्रमाणे उदयपूर येथे काँग्रेसचे चिंतन शिबीर सुरू आहे. यावेळी राहुल गांधींनी (Rahul Gandhi)भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, भाजपमधून आमच्या पक्षात आलेल्या अनेक नेत्यांनी मला सांगितले की, त्यांना दलित म्हणून भाजपमध्ये स्थान नाही. तिथे काय बोलायचे आणि काय नाही हे सांगितले जाते. भाजपमध्ये दलित समाजाचा अपमान होतो. आम्ही काँग्रेसमध्ये चर्चेची संधी तरी देतो. आम्ही हे रोज करतो. यामागे एक कारण आहे. देशातील जनतेशी संवाद साधणे हे काँग्रेसच्या डीएनएमध्ये आहे. ते कोणत्याही जातीचे, धर्माचे, स्थानाचे असोत. आम्ही रस्त्यावर उतरू, भाजप-आरएसएसच्या विचारसरणीशी सर्व शक्तीनिशी लढू.
तसेच राहुल गांधी म्हणाले, ‘आता आमचे लक्ष कोणाला पद मिळणार, या अंतर्गत बाबींवर आहे. मात्र आम्हाला बाहेरच्या समस्यांकडे जावे लागेल. देशातील लोकांमध्ये जायला हवे. विचार न करता आम्हाला लोकांमध्ये बसायला पाहिजे. जसे जनतेशी पूर्वी संबंध होते. आमचा जनतेशी असलेला संबंध तुटला आहे, तो आम्हाला परत करावा लागेल. आम्ही शॉर्टकटने घाम गाळणार नाही, तरच पुन्हा जनतेशी संपर्क साधू, असे ते म्हणाले. आपण जनतेतून जन्माला आलो आहोत, हा आपला डीएनए आहे. ही संघटना लोकांपासून बनलेली आहे. आम्ही पुन्हा जनतेसमोर जाऊ. ऑक्टोबरमध्ये संपूर्ण काँग्रेस पक्ष जनतेत जाईल, प्रवास करेल. जनतेशी असलेले नाते पुन्हा घट्ट करेल. हा एकमेव मार्ग आहे आणि यात कोणताही शॉर्टकट घेता येणार नाही.
राहुल गांधी म्हणाले, देश अराजकतेच्या तोंडावर, मी तुम्हाला कोरोनापूर्वी ही इशारा दिला होता, आता पुन्हा सांगत आहे. ते देशाच्या संस्था उद्ध्वस्त करत आहेत, ते जितक्या संस्था नष्ट करतील, तितकीच अराजकता माजणार आहे. ही अराजकता देशात माजू नये ही आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपल्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आहे. हे काम फक्त काँग्रेसच करू शकते. या देशात असा एकही धर्म, जात, व्यक्ती नाही जो म्हणू शकेल की त्यांच्यासाठी काँग्रेसने दरवाजे बंद केले आहेत. काँग्रेस हा सर्वांचा पक्ष आहे.
पंतप्रधान मोदी आणि भाजपने रोजगार निर्मितीचा कणा मोडल्याचा घणाघात राहुल गांधी यांनी केला. तसेच ते म्हणाले, नोटाबंदी आणि जीएसटी लागू करून सरकारने त्याचा फायदा दोन-तीन उद्योगपतींना देऊन तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले. आगामी काळात देशातील तरुणांना रोजगार मिळू शकणार नाही. महागाईमुळे रोजगार उपलब्ध होणार नाहीत. युक्रेन युद्धाच्या परिणामी बेरोजगारी वाढेल, असेही ते म्हणाले.
त्याचबरोबर राहुल गांधी म्हणाले, मला कशाची भीती नाही. मी माझ्या उभ्या आयुष्यात कोणाकडून एक रुपयाही घेतलेला नाही किंवा भ्रष्टाचार केला नाही. मी भारतमातेकडून एक पैसाही घेतला नाही. मी खरे बोलायला घाबरत नाही. ही लढाई आपल्या लगळ्यांची आहे. आम्ही मिळून भाजप आणि आरएसएसच्या संघटना आणि त्यांच्या विचारसरणीचा पराभव करून दाखवू. कधी कधी आमचे कार्यकर्ते नैराश्येत जातात.
प्रादेशिक पक्ष ही लढाई लढू शकत नाहीत. ही लढाई फक्त काँग्रेसच लढू शकते. प्रादेशिक पक्ष भाजपला पराभूत करू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे विचारधारा नाही, ते वेगळे आहेत.
आज कॅम्पमध्ये झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेसच्या बदलांना मंजुरी देण्यात आली आहे. काँग्रेस समितीच्या संघटना आणि राजकारणाच्या शिफारशींच्या आधारे आता प्रति कुटुंब एक तिकिटाचा फॉर्म्युला मंजूर करण्यात आला आहे. पाच वर्षे संघटनेत सक्रिय राहिल्यासच कुटुंबातील दुसऱ्या नेत्याला तिकीट मिळणार आहे. संस्थेत काम केल्याशिवाय दुसऱ्या सदस्याला तिकीट मिळणार नाही. पाच वर्षे पदे भूषविल्यानंतर तीन वर्षांचा काळ हा संयमाचा असेल. तीन वर्षे बाहेर राहिल्यानंतरच पद मिळेल. ही शिफारस CWCमध्ये स्वीकारण्यात आली आहे.
2024 पूर्वी होणाऱ्या 10 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर काँग्रेसचे लक्ष आहे. यामध्ये राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, नागालँड, तेलंगणा या राज्यांचा समावेश आहे. बैठकीत गुजरातचे प्रभारी रघु शर्मा म्हणाले की, हिमाचल आणि गुजरातमध्ये आम्ही जिंकलो नाही तर 2024 च्या निवडणुका विसरून जा.
आचार्य प्रमोद कृष्णन यांनी बैठकीत सांगितले की, जर राहुल गांधींना अध्यक्ष बनायचे नसेल तर प्रियंका यांना अध्यक्षपद द्यावे. ते म्हणाले की, दोन वर्षांपासून राहुल यांची मनधरणी करण्याची कसरत सुरू आहे. बैठकीत जी-23 शिबिराच्या नेत्यांनी सांगितले की, काँग्रेस संसदीय मंडळ स्थापन करावे, जेणेकरून निर्णय घेण्यास विलंब होणार नाही. या मंडळात त्यांच्यानुसार अध्यक्षांची नियुक्ती करावी. काँग्रेसच्या बैठकीत अनेक नेत्यांनी युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी सूचना केली. त्यांना त्यांच्या कामानुसार प्रमोशन मिळते. अजय माकन म्हणाले की, एक कुटुंब एक तिकिटाचा प्रस्ताव ठेवला जाईल. या सूत्रानुसार एका कुटुंबातील एका व्यक्तीला तिकीट दिले जाईल. मात्र, अटी लागू राहतील.
रविवारी तिसऱ्या दिवशी चिंतन शिबिर संपताच काँग्रेस नेते उदयपूर सोडण्यास सुरुवात करतील. सानिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह ज्येष्ठ नेते सोमवारी म्हणजेच 16 मे रोजी बेनेश्वर धामला जाणार आहेत. बेनेश्वर येथे 100 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या कल्व्हर्टची पायाभरणी सोनिया आणि राहुल यांच्या हस्ते होणार आहे. तसेच बेनेश्वर येथे सभा होणार आहे. ज्याला सोनिया आणि राहुल दोघेही संबोधित करतील. गुजरात आणि राजस्थानच्या आदिवासींना मदत करण्यासाठी ही महत्त्वाची सभा ठरणार आहे.