Rahul Gandhi Birthday : ‘देशभरातील तरुण रस्त्यावर आंदोलन करतोय, माझा वाढदिवस साजरा करु नका’, राहुल गांधींचं कार्यकर्ते आणि समर्थकांना आवाहन

| Updated on: Jun 19, 2022 | 12:32 AM

देशातील तरुण रस्त्यावर उतरुन आंदोलन करत असताना माझा वाढदिवस (Rahul Gandhi Birthday) साजरा करु नका, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलंय. पीटीआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

Rahul Gandhi Birthday : देशभरातील तरुण रस्त्यावर आंदोलन करतोय, माझा वाढदिवस साजरा करु नका, राहुल गांधींचं कार्यकर्ते आणि समर्थकांना आवाहन
राहुल गांधी, खासदार, काँग्रेस
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्ली : केंद्र सरकारची महत्वाकांक्षी अग्निपथ योजना (Agnipath Scheme) जाहीर झाल्यानंतर देशभरात आगडोंब उसळलाय. उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि तेलंगणासह देशातील 12 राज्यांमध्ये अग्निपथ योजनेविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आहे. बिहारमध्ये तर आंदोलकांनी रेल्वे गाड्या, रेल्वे स्टेशन, पोलीस स्टेशनही जाळलं आहे. देशातील विविध ठिकाणी आंदोलन रस्त्यावर उतरून या योजनेला विरोध करत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही अग्निपथ योजनेवरुन केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. त्याचवेळी राहुल गांधी यांनी आपल्या पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांना महत्वाचं आवाहन केलंय. देशातील तरुण रस्त्यावर उतरुन आंदोलन करत असताना माझा वाढदिवस (Rahul Gandhi Birthday) साजरा करु नका, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलंय. पीटीआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

राहुल गांधी यांचा आज 51 वा वाढदिवस आहे. यानिमित्त देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमाद्वारे त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचं नियोजन केलं आहे. सर्वच राज्यात काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा केला जाण्याची शक्यता आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने राहुल गांधी यांची सलग चार दिवस चौकशी केली. 20 जून नंतरही त्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. त्यावरुन काँग्रेसनं देशभरात आंदोलन छेडलं होतं. आज राहुल गांधी यांचा वाढदिवस असल्याने तो उत्साहात साजरा केला जाण्याची शक्यता आहे. मात्र अग्निपथ योजनेच्या विरोधात विविध राज्यात आंदोलनं सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभरात युवक रस्त्यावर उतरला असताना अशावेळी माझा वाढदिवस साजरा करु नका, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलंय.

बिहारमध्ये 138 एफआयआर तर 718 जणांना अटक

बिहारमध्ये अग्निपथ योजनेच्या विरोधात हिंसक निदर्शने होत आहेत. राज्यात हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर आतापर्यंत 138 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. यासोबतच 718 जणांना अटक करण्यात आली आहे. बिहारचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था संजय सिंह म्हणाले की, सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ फुटेजच्या आधारे हिंसाचार करणाऱ्यांची ओळख पटवली जात आहे.

271 मेल एक्सप्रेस आणि 159 पॅसेंजर गाड्या रद्द

‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात शनिवारी सलग चौथ्या दिवशीही देशाच्या विविध भागात निदर्शने सुरू होती. आतापर्यंत 210 मेल एक्सप्रेस आणि 159 पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वेने म्हटले आहे. दोन मेल एक्सप्रेस गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. एकूण 371 गाड्या प्रभावित झाल्या आहेत. बिहारमधील रेल्वेने मोठा निर्णय घेत शनिवारी पहाटे 4 ते रात्री 8 या वेळेत कोणतीही ट्रेन न चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी आग्रामध्ये यूपी प्रशासनाने कोचिंग सेंटर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.