CBSE Syllabus 2022 : शिक्षण (Education) क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी अभ्यासक्रमात बदल केले जात आहे. याच बदलांचा एक भाग म्हणून कर्नाटक सरकारने तेथील अभ्यासक्रमात असणाऱ्या काही गोष्टी काढून टाकल्या होत्या. त्या टिपू सुलतानचा भाग काढून टाकण्यात आला होता. त्यानंतर देशात राजकीय वाद निर्माण झाले होते. तर शिक्षण क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यानंतर आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) सत्र 2022-23 बोर्ड परीक्षांसाठी सुधारित अभ्यासक्रम जारी केला आहे. ज्यावर CBSE बोर्डावरही लोक निशाणा साधताना टीका करत आहेत. याचदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी देखील CBSE बोर्डावर निशाणा साधत आरएसएसचा खरपूस समाचार घेतला आहे. तसेच त्यांनी CBSE बोर्डाचे हे पाऊल म्हणजे दडपशाही असल्याचे म्हटले आहे.
अलीकडेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणावर राजकीय वादविवाद झाले आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) सत्र 2022-23 बोर्ड परीक्षांसाठी सुधारित अभ्यासक्रम जारी केला आहे. ज्यानंतर बोर्डावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. बोर्डाने जारी केलेल्या नवीन अभ्यासक्रमावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी बोर्डाचे हे पाऊल योग्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच याचे वर्णन त्यांनी दडपशाहीशी केले आहे.
तसेच राहुल गांधी यांनी आरएसएसवरही ताशेरे ओढले आहेत. त्यांनी यावेळी राष्ट्रीय शिक्षणाचा विध्वंस करणारा राष्ट्रीय शिक्षा श्रेडर असे म्हटले आहे. याशिवाय सीबीएसईला सेंट्रल बोर्ड आणि सप्रेसिव्ह एज्युकेशन असेही म्हटले आहे. त्यांच्या ट्विटमध्ये, त्यांनी सीबीएसईच्या अभ्यासक्रमातून काही विषय वगळण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. त्यात त्यांनी, फैझ, लोकशाही आणि विविधतेवरील कविता, मुघल कोर्ट, नॉन-अलाइन्ड मूव्हमेंट असे लिहले आहे.
Rashtriya Shiksha Shredder pic.twitter.com/kQG2WwZ77C
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 25, 2022