पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठी संधी होती. काँग्रेसला या संधीचं सोनं करता आलं नाही. पण राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बिहारमध्ये चांगल्याप्रकारे प्रचार केला होता, असे सांगत काँग्रेस नेते तारिक अन्वर (Tariq Anwar) यांनी पक्षनेतृत्त्वाची पाठराखण केली. (Tariq Anwar defends Rahul Gandhi over Kapil sibal statement)
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने एकूण 70 जागा लढवल्या होत्या. मात्र, यापैकी केवळ 19 जागांवरच पक्षाला विजय मिळाला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पक्षनेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पक्षनेतृत्त्वाने बिहारमधील पराभवाची अद्याप दखलही घेतलेली नाही, त्यांना हा पराभव सामान्य वाटत असावा, अशी टिप्पणी कपिल सिब्बल यांनी केली होती.
या टीकेला तारिक अन्वर यांनी अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिले. कपिल सिब्बल यांच्या वक्तव्याबद्दल मी बोलणे योग्य नाही. मात्र, राहुल गांधी यांनी बिहारमध्ये चांगला प्रचार केला होता. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे त्यांना सर्व ठिकाणी लक्ष द्यावे लागते, असे तारिक अन्वर यांनी म्हटले.
Shivanand Tiwari is senior & must think before making such remarks. Congress isn’t RJD. RJD is a regional party & its leaders are confined to Bihar. Rahul Gandhi had said he’ll come to Bihar whenever needed & he did so. He can’t work like leaders of RJD: Tariq Anwar, Congress https://t.co/sTFwsTm21P pic.twitter.com/7V3S4Pin0d
— ANI (@ANI) November 16, 2020
‘नितीश कुमारांनी हिंमत दाखवावी, महाराष्ट्राप्रमाणे सत्तांतर घडेल’
ज्याप्रमाणे भाजपसोबत मुख्यमंत्रिपदावरुन पेच निर्माण झाल्यावर शिवसेनेने भाजपशी फारकत घेतली आणि राष्ट्रवादी-काँग्रेससोबत हातमिळवणी करत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली, तोच फॉर्म्युला बिहारमध्ये वापरण्याचा तारिक अन्वर यांचा प्लॅन दिसत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हिंमत दाखवावी, महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये सत्तांतर घडू शकते, असं आवाहन तारिक अन्वर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना केलं.
काँग्रेस नेतृत्त्वाला बिहारमधील पराभव सामान्य बाब वाटत असावी: कपिल सिब्बल
अलीकडच्या काळातील निवडणुकांचे निकाल पाहता देशातील जनता काँग्रेसकडे एक सक्षम पर्याय म्हणून पाहत नसल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाने अजूनही बिहारमधील पराभवाची दखल घेतलेली दिसत नाही. या पराभवानंतर पक्षनेतृत्त्वाकडून कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यात आल्याचे माझ्या कानावर अद्याप आलेले नाही. कदाचित सर्वकाही सुरळीत आहे आणि बिहारचा पराभव ही सामान्य बाब आहे, असे पक्षनेतृत्त्वाला वाटत असावे, अशी टिप्पणी सिब्बल यांनी केली होती.
संंबंधित बातम्या:
नितीश कुमारांनी हिंमत दाखवावी, बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती घडेल : काँग्रेस
नितीश कुमार भलेही मुख्यमंत्री होतील पण रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडे असेल, काँग्रेस नेत्याचा निशाणा
(Tariq Anwar defends Rahul Gandhi over Kapil sibal statement)