Rahul Gandhi US Tour : ओडिसामध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातामुळे अवघा देश हळहळला आहे. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाष्य केलं आहे. राहुल गांधी सध्या अमेरिकेत आहेत. न्यूयॉर्कमधील भारतीय लोकांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी या अपघातावर भाष्य केलंय. तसंच काँग्रेसच्या काळातील अपघाताचा दाखला देत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
मला आठवतंय काँग्रेसच्या काळातही असाच रेल्वे अपघात झाला होता. तेव्हा काँग्रेस नेत्यांनी असं नाही म्हटलं की हा अपघात इंग्रजांमुळे झाला…. उलट त्यांनी म्हटलं की मी या अपघाताची मी जबाबदारी घेतो अन् राजीनामा देतो. पण आता तसं घडताना दिसत नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
भाजप कोणत्याही गोष्टीचा संदर्भ इतिहासाशी जोडतं. या अपघाताबद्दल जरी विचारलं तरी ते इतिहासाशी त्याचा संबंध जोडतील. भाजपला विचारलं की हा ओडिसातील रेल्वे अपघात कसा झाला तर ते म्हणतील, की काँग्रेसने मागच्या 50 वर्षात काय केलं?, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
#WATCH | …” You ask them (BJP) anything, they will look back and pass the blame..ask them how the #TrainAccident (Odisha) happened, they will talk about what Congress did 50 years ago…”: Congress leader Rahul Gandhi in New York pic.twitter.com/f6nu6BVK5c
— ANI (@ANI) June 4, 2023
ओडीसातील बालासोरजवळ कोरोमंडल एक्स्प्रेसचा अपघात झाला. अप लूप लाइनमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीला कोरोमंडल एक्स्प्रेसने धडक दिेली. त्यानंतर रुळावरून घसरलेले डबे शेजारच्या पटरीवर आदळले. तिथून जाणाऱ्या बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसलाही यामुळे अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 275 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजाराहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
राहुल गांधी सध्या अमेरिकेत आहेत. तिथे बोलताना ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यांनी नथूराम गोडसेचा देखील दाखला दिला. देशात सध्या एक महात्मा गांधी यांची विचारधारा आणि दुसरी नथूराम गोडेसची विचारधारांमध्ये संघर्ष सुरू आहे, असं राहुल गांधी म्हणालेत.
राहुल गांधी यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर हे लोक देशात द्वेष परसवत आहेत. यांनी लोकशाहीचा आधारस्तंभ असणाऱ्या संस्थांवरही कब्जा केला आहे, असं राहुल गांधी म्हणालेत.