नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा महागाईनं डोकं वर काढलंय. पेट्रोल आणि डिझेलचे भाव (Petrol, Diesel Rate) तर गगनाला भिडले आहेत. आयओसीएलने दिलेल्या माहितीनुसार आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे प्रत्येकी 80 पैशांची वाढ झाली आहे. बुधवारी देखील इंधनाच्या दरात लिटरमागे 80 पैशांची वाढ करण्यात आली होती. नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 101.81 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेल 93.07 रुपये प्रति लिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोल, डिझेलचा दर प्रति लिटर मागे 84 पैशांनी वाढला आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 116.72 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा दर वाढून 100.94 रुपये झाला आहे. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. राहुल गांधी यांनी ट्वीट करुन जगभरातील पेट्रोलचे भाव आणि भारतातील पेट्रोलच्या दराची यादीच दिलीय.
राहुल गांधी ट्विटरद्वारे भारताच्या शेजारील देशांमधील पेट्रोलचे भाव सांगितले आहेत. राहुल गांधी यांनी केलेल्या ट्वीटनुसार अफगाणीस्तानात पेट्रोलचे दर 66.99 रुपये प्रति लीटर आहे. तर पाकिस्तानात 62.38 रुपये प्रति लीटर, श्रीलंकेत 72.96 रुपये प्रति लीटर, बांग्लादेशमध्ये 78.53 रुपये प्रति लीटर, भुतानमझ्ये 86.28 रुपये प्रति लीटर, नेपाळमध्ये 97.05 रुपये प्रिती लीटर, तर भारतात 101.81 रुपये प्रति लीटर पेट्रोल असल्याचं सांगितलं. हे ट्वीट करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवरही हल्ला चढवलाय. ‘प्रश्न न पूछो ‘फ़क़ीर’ से, कैमरा पर बाँटे ज्ञान। जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान॥’ अशा शब्दात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय.
Petrol Rate in Indian Rupees (₹)
Afghanistan: 66.99
Pakistan: 62.38
Sri Lanka: 72.96
Bangladesh: 78.53
Bhutan: 86.28
Nepal: 97.05
India: 101.81प्रश्न न पूछो ‘फ़क़ीर’ से, कैमरा पर बाँटे ज्ञान।
जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान॥#MehangaiMuktBharat— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 31, 2022
राहुल गांधी यांनी कालही मोदींवर निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदी यांची रोजची टू डू लिस्ट असं म्हणत 5 मुद्द्यांवरुन मोदींवर हल्ला चढवला होता.
प्रधानमंत्री की Daily To-Do List
1. पेट्रोल-डीज़ल-गैस का रेट कितना बढ़ाऊँ
2. लोगों की ‘खर्चे पे चर्चा’ कैसे रुकवाऊँ
3. युवा को रोज़गार के खोखले सपने कैसे दिखाऊं
4. आज किस सरकारी कंपनी को बेचूँ
5. किसानों को और लाचार कैसे करूँ#RozSubahKiBaat— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 30, 2022
इतर बातम्या :