Rahul Gandhi Lok Sabha Live : लिहून घ्या, शेतकरी मागे हटणार नाही, तुम्हाला हटावं लागेल, कायदे मागे घ्यावेच लागतील

| Updated on: Feb 11, 2021 | 5:55 PM

केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) हे 'हम दो हमारे दो'चं सरकार आहे, (Hum do, hamare do) असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.

Rahul Gandhi Lok Sabha Live : लिहून घ्या, शेतकरी मागे हटणार नाही, तुम्हाला हटावं लागेल, कायदे मागे घ्यावेच लागतील
राहुल गांधी
Follow us on

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi Lok sabha) यांनी लोकसभेत आक्रमक पवित्रा घेतला. केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) हे ‘हम दो हमारे दो’चं सरकार आहे, (Hum do, hamare do) असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं नाव न घेता केला. कृषी कायद्यावरुनही राहुल गांधींनी टीकास्त्र सोडलं. फक्त चार लोक देश चालवत आहेत. शेतकरी हा देशाचा कणा आहे, असं राहुल गांधी म्हणाले. (Rahul Gandhi speech at lok sabha said modi government is Hum do, hamare do sarkar)

राहुल गांधी यांचं भाषण सुरु असताना भाजप खासदारांनी एकच गदारोळ केला. लोकसभा अध्यक्षांनी अनेकवेळा सांगूनही खासदारांचा हा गदारोळ सुरुच होता. एकवेळ अशी आली, राहुल गांधी यांचा माईकही बंद केला. राहुल गांधी म्हणाले, अध्यक्षजी, आपने मेरा माईक बंद करोगे, तो मै बोलूंगा कैसे?

या गदारोळ राहुल गांधींनी भाषणाला सुरुवात केली. शेतकऱ्यांकडे जर दुर्लक्ष केलं तर या देशात भूकबळी जातील, देशात रोजगार उपलब्ध होणार नाहीत, ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडेल असं राहुल गांधी म्हणाले.

देशाला उद्ध्वस्त करण्याची सुरुवात नोटबंदीपासून सुरु झाली. ही काही नवी गोष्ट नाही. हा पहिलाच प्रयत्न नाही. हे काम पंतप्रधानांनी हम दो हमारे दो साठी नोटबंदीपासून सुरु केलं. गरिबांचे पैसे घेऊन हम दो हमारे दोच्या खिशात टाकले. शेतकऱ्यांना बर्बाद केलं, जीएसटी आणून व्यापाऱ्यांना बर्बाद केलं, त्यानंतर आता पुन्हा शेतकऱ्यांवर, व्यापाऱ्यांवर आणि मजुरांवर हल्ला केला.

कोरोनाकाळात मजूर ओरडत होते, आम्हाला तिकीट द्या, पण या सरकारने ते दिलं नाही. या सरकारने केवळ व्यापाऱ्यांचं, उद्योगांचं भलं केलं. नोटबंदीनंतर दोन चार उद्योगपतींना मदत केली. मात्र आता शेतकऱ्यांचा कणाच मोडलाय, ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केलीय, आता ते उभंच राहू शकत नाहीत.

हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही, हे देशाचं आंदोलन आहे. शेतकरी फक्त अंधारात प्रकाश दाखवत आहेत. संपूर्ण देश हम दो हमारे दो यांच्याविरोधात एकजूट झाला आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

लिहून घ्या, तुम्ही म्हणत असाल, देशातील शेतकरी, मजूर, व्यापाऱ्याला तुम्ही पैशांनी नमवू शकाल असं वाटत असेल, पण लिहून घ्या, शेतकरी एक इंचही मागे हटणार नाही, शेतकरी-मजूर तुम्हाला हटवेल, पण तो एक इंचही मागे हटणार नाही. तुम्हाला कायदा मागे घ्यावाच लागेल.

शेतकऱ्यांना संसदेत श्रद्धांजली

मी आज बजेटवर बोलणार नाही, केवळ शेतकऱ्यांवरच बोलणार. जे २०० शेतकरी शहीद झाले त्यांना तुम्ही श्रद्धांजलीही दिली नाही. माझ्या भाषणानंतर २ मिनिटे श्रद्धांजलीसाठी उभे राहीन, तुम्हीही साथ द्या, असं राहुल गांधी म्हणाले.

VIDEO

(Rahul Gandhi speech at lok sabha said modi government is Hum do, hamare do sarkar farm laws should take back)