नवी दिल्ली | 8 मार्च 2024 : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी पुन्हा केरळच्या वायनाड येथून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. कॉंग्रेसच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव जाहीर केले आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतच वायनाड सिटवर मित्र पक्षातच लढत होणार आहे. केरळात सत्ताधारी लेफ्ट डमोक्रेटिक फ्रंट ( LDF ) मध्ये सहभागी भारतीय कम्युनिस्ट पार्टीने याआधीच लोकसभेचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे केरळच्या वायनाड सिटमधून सीपीआयने ॲनी राजा यांना लोकसभेच्या निवडणूकांसाठी उतरविले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते ना सीपीआयने एनी राजा यांना उभे करण्यापूर्वी कॉंग्रेसला विचारले असेल आणि ना कॉंग्रेसने राहुल गांधी यांची उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी सीपीआयला विचारले असेल…
राहुल गांधी आणि ॲनी राजा यांची आमने-सामने निवडणूक होणे खूपच रंजक ठरणार आहे. ॲनी राजा सीपीआयचे सरचिटणीस डी.राजा यांच्या पत्नी आहेत. तसेच सीपीआयच्या राष्ट्रीय महिला फेडरेशनच्या देखील सरचिटणीस आहेत. तसेच त्या सीपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य देखील आहेत. ॲनी राजा यांनी सीपीआयमध्ये अनेक जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत. परंतू त्या प्रथमच लोकसभा निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे.
वायनाड लोकसभा सीटमधून ॲनी राजा यांना काही दिवसांपूर्वी उमेदवार घोषीत केले होते तेव्हा त्यांचे मानने होते की केरळच्या राजकीय स्थितीला इंडीया ब्लॉक हून वेगळी आहे. ॲनी राजा यांचे म्हणणे होते की केरळातील लढाई लेफ्ट डमोक्रेटिक फ्रंट ( LDF ) एडीएफ विरुध्द काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट युडीएफ अशी आहे. परंतू उत्तरेच्या राजकारणात दोन्ही पक्ष इंडीया आघाडीत एकत्र आहेत. त्यामुळे नैतिकदृष्ट्या कार्यकर्त्यांना आदेश देणे कठीण होणार आहे.
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी गेल्या निवडणूकीत वायनाड येथील चार लाखांच्या मतांच्या फरकाने जरी निवडून आले असले तरी यंदा राहुल गांधी यांना सहज विजय मिळणे कठीण असल्याचे म्हटले जात आहे. सीपीएमच्या नेतृत्वाखाली एलडीएफमध्ये सीपीआयला केरळमध्ये 20 जागा पैकी चार जागा मिळाल्या आहेत. म्हणजे शशी थरुर यांच्या सीटवरही सीपीआयचा उमेदवार असणार आहे.